पोलिसाकडूनच IITच्या विद्यार्थीनीचा वियनभंग; आरोपीला अटक, एक निलंबित : Navi Mumbai | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navi Mumbai

Navi Mumbai: पोलिसाकडूनच IITच्या विद्यार्थीनीचा वियनभंग; आरोपीला अटक, एक निलंबित

नवी मुंबईतील पाम बीच रोड भागात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात IITत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीचा एका पोलिसानं विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित पोलिसाला अटक करण्यात आली असून आणखी एका पोलिसाला निलंबित करण्यात आलं आहे. (Mumbai 18 yr old IIT student allegedly molested by Navi Mumbai police constable at Palm beach)

नवी मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, पाम बीच रोड इथं काल रात्री (शुक्रवार) आयआयटीमध्ये शिकणाऱ्या एका १८ वर्षांच्या विद्यार्थीनीचा नवी मुंबई पोलिसांतील एका कॉन्स्टेबलने विनयभंग केला. या घटनेनंतर पीडित मुलगी याची तक्रार देण्यासाठी नजिकच्या पोलीस ठाण्यात गेली. मात्र, या ठिकाणीच्या इन्चार्जनं त्या मुलीची तक्रार नोंदवून घेतली नाही. यामुळं या पोलीस इन्चार्जला निलंबित करण्यात आलं आहे.

हे ही वाचा : Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

टॅग्स :Mumbai NewsNavi MumbaiIIT