Mumbai : 'तुझे दोन पैसे नको पण वेळेत घरी ये'; ३ घटनांनी महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर

Mumbai Local
Mumbai Local

मुंबई : मुंबईत बुधवारी (ता.१४ ) धावत्या लोकलमध्ये एका मुलीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. आठवडाभरापूर्वी चर्चगेटमधील एका तरुणीवर वसतिगृहात बलात्कार करून तीची हत्या करण्यात आली. तर मीरा रॉड परिसरात लिव्ह इन रिलेशनमधून एका महिलेची क्रूर हत्या करण्यात आली.

Mumbai Local
Mumbai : लोकलमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना! लाल ड्रेसमुळे 'असं' पकडलं आरोपीला

मुंबई शहरात एकाच महिन्यात सलग घडलेल्या या तीन घटनांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढू लागली आहे. त्यामुळे कामानिमीत्ताने बाहेर पडणाऱ्या महिलांच्या कुटुंबियाची काळजी वाढली आहे.महिला लोकप्रतिनीधींनी या घटनाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

मुंबईत नोकरीनिमित्ताने येणाऱ्या पनवेल येथील मानसी शेंडे म्हणाल्या, मी गेले १५ वर्षे मुंबईत नोकरीनिमित्ताने येते आहे. मात्र मागील काही दिवसात ज्या घटना मुंबई आणि परिसरात ऐकण्यात येत आहेत, त्यामुळे आमच्याशी आमचे कुटुंबीय देखील चिंतीत आहेत. 'तुझे दोन पैसे नको पण वेळेत घरी ये, असे' कुटुंबीय अत्यंत काळजीने सांगतात, असेही त्या म्हणाल्या.

डोंबिवली ते सीएसएमटी प्रवास करणाऱ्या हर्षदा पवार म्हणाल्या,"या घटना थेट मुलींच्या करिअरवर परिणाम करणाऱ्या आहेत. भरदिवसा उजेडात मुलींना छेडछाड करण्याची हिंमत होते हे प्रशासनाचे अपयश आहे.आता घरी पोहोचायला ५ मिनिटही पुढे मागे वेळ झाला तर घरच्यांना काळजी वाटते. यावर वेळीच उपाय करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

Mumbai Local
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर, इथे पाहा डिटेल्स

या संतापजनक घटनेमुळे मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे. या घृणास्पद घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी.

- सुप्रिया सुळे, खासदार

मुंबईत धावत्या लोकल ट्रेनमध्ये तरुणीवर अत्याचाराची घटनेमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत सकाळी सुद्धा महिला सुरक्षित नसणं ही चिंताजनक बाब आहे. हे सुरक्षा यंत्रणांचेच अपयश आहे. राज्य महिला आयोगाने संबंधितांना याबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

- रुपाली चाकणकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग

चालत्या लोकलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार होतो हे धक्कादायक आहे. मुंबईतील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना लाजिरवाण्या आहेत. मुंबईत सलग घडलेल्या तीन घटनांनंतर सरकार खडबडून जागे व्हायला पाहिजे होते. पण शिंदे, फडणवीसांना कशाचीही चाड राहिलेली नाही.

- संध्या सव्वालाखे, अध्यक्षा, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस

लोकलमध्ये महिलांना सुरक्षित वातावरण देणे हे रेल्वे पोलिसांची जबाबदारी आहे, त्यापासून त्यांना पळ काढता येणार नाही. यानिमित्ताने रेल्वे हेल्पलाइन आणि लोकलमधील महिलांबाबतचे गुन्ह्यांचे ऑडिट करणं गरजेचे आहे. आगामी काळात ते नक्कीच होईल.

-चित्रा वाघ, अध्यक्ष, भाजप महिला मोर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com