मुंबईत 44 टक्के हाय रिस्क कॉन्टॅक्ट तर 14 टक्के नागरिक कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईत 44 टक्के हाय रिस्क कॉन्टॅक्ट तर 14 टक्के नागरिक कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई: कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला असता 44 टक्के व्यक्ती "हाय रिस्क कॉन्टॅक्ट" मध्ये असल्याचे समोर आले आहे. त्यातील 14 टक्के व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांना "होम क्वारंटाईन" तसेच "इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटर"मध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत डिसेंबर 6 ला एकूण 8 हजार 118 व्यक्तींची "कॉन्टॅक्ट ट्रेसिंग"च्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. त्यातील 4 हजार 564 व्यक्ती "हाय रिस्क कॉन्टॅक्ट" असल्याचे समोर आले. 3 हजार 554 व्यक्ती "लो रिस्क कॉन्टॅक्ट" मध्ये असल्याचे आढळले. यावरून मुंबईत बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींचा आकडा वाढताना दिसतो.

"कॉन्टॅक्ट ट्रेसिंग"च्या माध्यमातून मुंबईत आतापर्यंत 40 लाख 81 हजार 311 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यातील 17 लाख 87 हजार 901 (44 %) व्यक्ती "हाय रिस्क कॉन्टॅक्ट" मध्ये असल्याचे समोर आले आहे. तर 2 लाख 86 हजार 311 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. एकूण रूग्णांपैकी 22 लाख 93 हजार 410 व्यक्ती (56%) "लो रिस्क" मध्ये असल्याचे पालिकेने आपल्या अहवालात म्हटले आहे.

मुंबईत सध्या 4 लाख 70 हजार 335 व्यक्ती "होम क्वारंटाईन"मध्ये आहेत. तर 36 लाख 10 हजार 481 व्यक्तींनी आपला क्वारंटाईन काळ पूर्ण केला आहे. आतापर्यंत 1 लाख 60 हजार 084 व्यक्तींना "इन्स्टिट्युशनल क्वारंटाटईन सेंटर" मध्ये पाठवण्यात आले. सध्या त्यातील 495 व्यक्ती "होम क्वारंटाईनमध्ये" आहेत. 

संभाव्य दुसरी लाट थोपवण्यासाठी "कॉन्ट्रक्ट ट्रेसिंग"वर भर देण्यात आला आहे. बाधितांच्या संपर्कात येणा-या तसेच प्रत्येक संशयित व्यक्तीची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईत बाधितांचा आकडा काहीसा वाढलेला दिसत असून त्यात "असिंटेमॅटीक" रूग्ण अधिक असल्याचे  पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी सांगितले.

मुंबईतील चाचण्यांची संख्या आम्ही वाढवली आहे. दररोज साधारणता 17 हजार चाचण्या करण्यात येत आहे. "कॉन्टॅक्ट ट्रेसिंग"वर ही भर देत आहोत. इमारती , झोपडपट्ट्यांसह दुकानदार , फेरिवाले तसेच बस, ट्रेन, विमानातून येणा-या प्रवाशांच्या कसून तपासण्या करण्यात येत असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. 

----------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai 44 per cent high risk contact and 14 per cent corona positive

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com