esakal | मुंबईत पुन्हा अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, ५१ वर्षीय व्यक्तीला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

rape case

मुंबईत पुन्हा अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, ५१ वर्षीय व्यक्तीला अटक

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत साकीनाका (sakinaka rape case) येथे महिलेवर झालेल्या बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच अंधेरी पूर्वेला (Andheri) एका अल्पवयीन मुलीबरोबर लैंगिक गैरवर्तन (abusing minor girl) झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ५१ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) दिलेल्या माहितीनुसार, आयपीसीच्या कलम ३५४ आणि पॉस्को कायद्यातंर्गत आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पुणे आणि मुंबईत झालेल्या बलात्काराच्या घटनांमुळे महाराष्ट्र सरकारवर सध्या चौफेर टीका सुरु आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या लोकांचा रेकॉर्ड ठेवला जाईल असे त्यांनी सांगितले. साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

हेही वाचा: तालिबानवर विश्वास ठेवणं कठीण! 'सकाळ'च्या मुलाखतीवर तज्ज्ञांच मत

मुंबईतील साकीनाका बलात्कार आणि मृत्यू प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून २० लाख रुपयांची नुकसान भारपाई जाहीर झाली आहे. या प्रकरणामुळं केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरुन गेला आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणाशी या प्रकरणाची तुलना केली जात असून अमानुषपणे पीडित महिलेवर अत्याचार झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या भीषण बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडित महिला ही अनुसुचित जातीची असल्यानं मुंबई पोलिसांनी आरोपीवर अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल केला आहे.

loading image
go to top