esakal | १८ वर्षावरील लसीकरण; पहिल्या दिवसाचं उद्दिष्ट पूर्ण, 992 जणांनी घेतली लस

बोलून बातमी शोधा

Corona Updates Marathi News
१८ वर्षावरील लसीकरण; पहिल्या दिवसाचं उद्दिष्ट पूर्ण, 992 जणांनी घेतली लस
sakal_logo
By
मिलिंद तांबे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई: पालिकेकडून मोठ्या प्रमाण योग्य नियोजन करून लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र केंद्र सरकारकडून लसीचा योग्य पुरवठा नसल्याने अनेकदा लसीकरण बंद झाले. मात्र लसींचा पुरवठा झाल्याने 1 मे पासूनच सुरू होणाऱ्या 18 वर्षावरील 992 जणांना कोविड लसीकरण करणे शक्य झाले. पहिल्या दिवशी 1000 जणांना लस देण्याचे उद्दिष्ट त्यामुळे जवळपास पूर्ण झाल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी सांगितले. मात्र लसींचा पुरेसा साठा येत नसल्याने लसीकरण वाढविण्याच्या प्रक्रियेत अडचणी येत आहेत.

मुंबईकरांना लस मिळावी, लसीकरणास अडचणी येऊ नयेत तसेच घराजवळ लसीकरण सुविधा मिळावी यासाठी पालिका कोविड सेंटरची संख्या दुपटीने वाढविणार आहे. सध्या 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. त्यावेळी नागरिक लस घेण्यास तयार नव्हते. मात्र पालिकेच्या योग्य जनजागृतीनंतर नागरिक लस घेण्यास पुढे येऊ लागले. त्यानंतर अनेकदा केंद्राकडून लसीचा योग्य पुरवठा न झाल्याने लसीकरण थांबले.

केंद्राने 1 एप्रिलपासून 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू केले आहे. शनिवारी कोविन अॅपवर नोंदणी 18 वर्षावरील 992 जणांनी नायर, बीकेसी जंम्बो, सेवन हिल्स, राजावाडी, कूपर अशा लसीकरण केंद्रात लस घेतली. रविवारी 18 वर्षावरील नागरिकांना या पाच केंद्रावर लसीकरण केले जाणार असून प्रत्येक केंद्राला 500 लसीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र कोविन अॅपवर रजिस्ट्रेशन केलेल्याच नागरिकांना लस देण्यात येणार आहे.

पालिकेनं यासाठी लसीकरण केंद्र वाढविली सध्या मुंबई पालिका आठवड्याला 10 लाख डोसची आवश्यकता आहे. 90 लाख लोकांना लसीकरण करायचे आहे. त्यात 18 ते 44 या वयोगटातील 49 लाख नागरिक आहेत. तसेच रोज 2 लाख जणांना लस देऊ शकते इतकी क्षमता पालिकेची असून डोसच्या तुटवड्यामुळे अडचणी वाढत असल्याचे काकाणी सांगतात.

तर सध्या 25 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. सुमारे 60 लाखांहून अधिक लोकांना लवकरात लवकर लसीकरण करायचे आहे. 18 वर्ष ते 44 वर्षाच्या नागरिकांच्या लसीकरणासाठी केवळ 20 हजार डोस आले असून त्यामुळे मोठया प्रमाणावर लसीकरण करणे शक्य होत नसल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी सांगितले.

(संपादन- पूजा विचारे)

mumbai 992 people over age of 18 were vaccinated vaccine stock is incomplete