#AareyForest बॉलिवूडकरांनो ढोंगीपणा बंद करा; नेटिझन्सने सुनावले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

बॉलिवूडला ट्रोल करताना सेलिब्रिटी मंडळी वातानुकूलित आलिशान मोटारींमधून याच परिसरातील चित्रनगरीत जात असल्याचा उल्लेखही काही जणांनी केला. लोकांनी त्यांना ट्रोल केलंय हे म्हणत की तुमची फिल्मसिटी बंद करा. परंतु अनेक नेटकरांनी त्यांना टीकेचे लक्ष्य केले. बॉलिवूड कलाकार ढोंगी असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. 

मुंबई : आरे वसाहतीत मेट्रो कारशेडसाठी सुरु असलेल्या वृक्षतोडीवरून संताप व्यक्त करणाऱ्या कलाकारांनाच नेटिझन्सने सुनावले आहे. आरेमधील तुमची फिल्मसिटी बंद करा अशी मागणी करत #ShutDownFilmCity  असा ट्रेंड सुरु करून नेटिझन्सनी 2000 मधील आणि 2019 मधील आरे जंगलाची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.

बॉलिवूड कलाकारांनी #SaveAarey म्हणत आरेतील वृक्षतोडीला विरोध केला आहे. अभिनेता वरुण धवनसह करण जोहर, विशाल ददलानी, दिया मिर्झा, फरहान अख्तर, स्वरा भास्कर यांनी ट्विट करत वृक्षतोड थांबविण्याची मागणी केली. मात्र, त्याला कलाकारही जबाबदार असल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे. मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोड करण्याच्या विरोधातील याचिका फेटाळल्यानंतर रातोरात जवळपास 400 झाडांवर कुऱ्हाड चालवली गेली आहे. अजूनही वृक्षतोड सुरुच आहे. 

बॉलिवूडला ट्रोल करताना सेलिब्रिटी मंडळी वातानुकूलित आलिशान मोटारींमधून याच परिसरातील चित्रनगरीत जात असल्याचा उल्लेखही काही जणांनी केला. लोकांनी त्यांना ट्रोल केलंय हे म्हणत की तुमची फिल्मसिटी बंद करा. परंतु अनेक नेटकरांनी त्यांना टीकेचे लक्ष्य केले. बॉलिवूड कलाकार ढोंगी असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Aarey Forest ShutDownFilmCity in trending on twitter