esakal | #AareyForest 'आरे'तील वृक्षतोडीबद्दल बॉलिवूडमधून संताप 
sakal

बोलून बातमी शोधा

Aarey forest

अनेक कलाकारांनी ट्‌विटर व अन्य समाजमाध्यमांवरून संतप्त प्रतिक्रिया दिल्या, परंतु अनेक नेटकरांनी त्यांना टीकेचे लक्ष्य केले. ही सेलिब्रिटी मंडळी वातानुकूलित आलिशान मोटारींमधून याच परिसरातील चित्रनगरीत जात असल्याचा उल्लेखही काही जणांनी केला. 

#AareyForest 'आरे'तील वृक्षतोडीबद्दल बॉलिवूडमधून संताप 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आरे वसाहतीत मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोडीला शुक्रवारी (ता. 4) रात्री सुरुवात झाली. पोलिस बंदोबस्तात झालेल्या या वृक्षतोडीविरोधात स्थानिकांसह पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने जमले. या वृक्षतोडीबद्दल बॉलिवूडमधील कलाकारांनीही संतात व्यक्त केला. तसेच कलाकारांकडून #ShutDownFilmCity हा हॅशटॅग वापरून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. 

अनेक कलाकारांनी ट्‌विटर व अन्य समाजमाध्यमांवरून संतप्त प्रतिक्रिया दिल्या, परंतु अनेक नेटकरांनी त्यांना टीकेचे लक्ष्य केले. ही सेलिब्रिटी मंडळी वातानुकूलित आलिशान मोटारींमधून याच परिसरातील चित्रनगरीत जात असल्याचा उल्लेखही काही जणांनी केला. 
 

"आरे'तील झाडे तोडल्याबद्दल आम्ही सारेच शोक करत आहोत. ज्यांनी झाडांना आपल्या जीवनाचा एक भाग मानला आणि झाडे ही परमेश्‍वराची सर्वांत मोठी देणगी मानली, त्यांच्यासाठी हा सर्वांत वाईट दिवस आहे. या विनाशाची किंमत मुंबईला मोजावी लागेल. 
- अशोक पंडित, निर्माता 

रात्रीच्या वेळी आरे कॉलनीतील झाडे तोडली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृपा करून असे करू नका. एक फोन करा आणि हे थांबवा. 
- विशाल ददलानी, संगीतकार 

आरे वसाहतीत सुरू असलेले झाडे तोडण्याचे काम बेकायदा नाही? 
- दिया मिर्झा, अभिनेत्री 

रात्रीच्या वेळी झाडे तोडणे अत्यंत चुकीचे आहे. हा प्रकार फारच लज्जास्पद आहे. 
- फरहान अख्तर, अभिनेता 

लज्जास्पद... 
- स्वरा भास्कर, अभिनेत्री