corona vaccination
corona vaccination

लसीकरण झालेल्या ६० वर्षांपुढील मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी

लसीकरणानंतर काही गोष्टी निदर्शनास आल्या
Published on

मुंबई: कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका ६० वर्ष वयोगटातील (senior citizen) नागरिकांना आहे. त्यामुळे लसीकरणामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या या वयोगटाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले. कोरोना प्रतिबंधक लसीकरण (vaccintation) सुरु होण्याआधी यावर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण अनुक्रमे ७६ टक्के आणि ८४ टक्के होते. मार्च महिन्यातही या वयोगटाचे मृत्यूचे प्रमाण ८० टक्के होते. (Mumbai after vaccination Not just deaths cases among elderly lowering too)

एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईत अनुक्रमे १,४७५ आणि १,५८१ मृत्यू झाले. पण यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होते. मार्च महिन्यात ६० वर्षावरील वयोगटात ५ लाख आणि एप्रिलमध्ये ४ लाख नागरिकांचे लसीकरण झाले. ४५ ते ५९ वयोगटात ४८ टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतलाय. फक्त आठ टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

corona vaccination
BLOG: ठाकरे सरकार 'बंदबुद्धी'तून बाहेर पडणार?

४० वयोगटाच्या आत मृत्यूचे प्रमाण जानेवारीमध्ये ३.४ टक्के होते ते मे मध्ये ७ टक्क्यापर्यंत पोहोचले. या वयोगटात फक्त दोन टक्केच लोकांनाच लसीचा पहिला डोस मिळालाय. "७७ टक्के ज्येष्ठ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलाय आणि त्यानंतर मृत्यूदर कमी झाला असेल, तर लसीकरणाने त्याचे काम केलेय असे म्हणायला हरकत नाही पण याचा सखोल अभ्यास झाला पाहिजे" असे डॉ. विनिता बाल म्हणाल्या.

corona vaccination
नात्याला कलंक, पुतण्यानेच काकीवर केला बलात्कार

लोकसंख्येच्या मोठ्या गटाचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतरच नेमके चित्र समोर येईल असे त्यांनी सांगितले. लसीचा एक डोस घेतल्यानंतरही वृद्धांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे निरीक्षण आहे. मृत्यूदरच नाही, तर वृद्धांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com