Mumbai Crime : शरिरसंबंध, नोकरी अन् पैशाचं अमिष; 28 कोटींचे कोकेन घेऊन तो विमानतळावर अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Crime

Mumbai Crime : शरिरसंबंध, नोकरी अन् पैशाचं आमिष; 28 कोटींचे कोकेन घेऊन तो विमानतळावर अन्...

मुंबई - मुंबई विमानतळावर ६ जानेवारी रोजी कस्टम विभागाने एका भारतीय नागरिकाला २८.१० कोटी रुपयांचे २ किलो ८१० ग्रॅम कोकेनसह अटक केली होती. खास डिझाईन केलेल्या एका डफल बॅगच्या थरांमध्ये कोकेन लपवले गेले होते. याबाबत नवीन खुलासा झाला आहे.(Mumbai Crime news in Marathi)

हेही वाचा: Dollar vs Rupee : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला, आता एक डॉलर...

तपासात असे दिसून आले की, एका महिलेने आरोपीशी फेसबुकवर मैत्री केली होती. महिलेने, आधी त्या व्यक्तीला नोकरी लावण्याचे अमिष दाखवले. त्यानंतर शारीरिक संबंध ठेवण्याचे आणि पैसे देण्याचे आमिष दाखवले. या सापळ्यात फसून आरोपी अदीस अबाबाने कोकेन घेऊन मुंबई विमानतळ गाठलं.

मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशाकडून नेण्यात येत असलेल्या कपड्यांमध्ये कोकेन लपवण्यात आलं होतं. या प्रवाशाला अटक करण्यात आली असून त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या टोळीमागचा खरा सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा: Urfi Javed Chitra Wagh : "अशी कशी गं तू.."; उर्फीचं मराठीत ट्वीट अन् कमेंट्समध्ये भरलं कविसंमेलन

२०२३ मध्ये मुंबई एअरपोर्ट कस्टम्सने अंमली पदार्थांची केलेली ही तिसरी जप्ती आहे. नैरोबीहून 4.47 किलो हेरॉईन घेऊन जाणाऱ्या भारतीय प्रवाशाला कस्टमने 4 जानेवारी रोजी मुंबई विमानतळावर अटक केली होती. 6 जून रोजी आणखी एका भारतीय प्रवाशाला 1.596 किलो कोकेन बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. याशिवाय मुंबई एअरपोर्ट कस्टम्सने 2023 मध्ये 13.73 किलो सोनं आणि 1.5 कोटी विदेशी चलन जप्त केलं आहे.

हेही वाचा योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

टॅग्स :Mumbai NewsCrime News