Crime: अंडरवेअरमध्ये लपवलं 10 कोटींचे कोकेन; मुंबईत झाला पर्दाफाश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cocaine

Crime: अंडरवेअरमध्ये लपवलं 10 कोटींचे कोकेन; मुंबईत झाला पर्दाफाश

मुंबई : मुंबई विमानतळावरून तब्बल 9.8 कोटींचे कोकन जप्त करण्याल आले आहे. अदिस अबाबा येथून आलेल्या इथियोपियन एअरलाइन्सच्या फ्लाइट ET-610 मधून जवळपास 9.8 कोटी रुपये किमतीचे 980 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. तर अंतर्वस्त्रांमध्ये लपवलेल्या कोकेनसहित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

(Mumbai Airport Customs Seized 980 Grams Cocaine)

अधिक माहितीनुसार, आदिस अबाबा येथून इथियोपियन एअरलाईन्सच्या विमानातून हे कोकेन जप्त करण्यात आले आहे. सीमाशुल्क विभागाने ही कारवाई केली असून सदर व्यक्तीने अंडरवेअर मध्ये लपवून कोकेन आणले होते. दरम्यान, आठवड्यातील ही दुसरी घटना असून 29 सप्टेंबर रोजी एका महिलेने सँडलमध्ये लपवून 6 कोटी रूपयांचे कोकेन आणले होते.

दरम्यान, गुजरात येथील बंदरावर अनेक अंमली पदार्थांच्या तस्करीच्या घटना वारंवार घडत असतात. त्यानंतर आता मुंबईत अशा घटना घडत असून 10 कोटी किंमतीचे कोकेन जप्त करण्यात आले आहे.

टॅग्स :Mumbai NewscrimeAirport