Rohit Arya Shot Dead in Police Encounter
esakal
मुंबई : गुरुवारी सकाळी रोहित आर्या नावाच्या एका तरुणाने मुंबईच्या अंधेरी परिसरातील एका खासगी स्टुडिओत नाट्यमय प्रकार घडवून (Rohit Arya Shot Dead in Police Encounter) आणला. महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या 10 ते 17 तरुण मुलांना ओलीस ठेवून त्याने पोलिस प्रशासनाला आव्हान दिले. सुमारे तीन तास चाललेल्या या तणावपूर्ण ओलीस नाट्यानंतर पोलिसांनी स्टुडिओभोवती तगडा बंदोबस्त उभारला आणि आर्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू केला.