मुंबई : बेस्टचे ‘पुढे चला’ डिजिटल अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Best bus

मुंबई : बेस्टचे ‘पुढे चला’ डिजिटल अभियान

मुंबई : मुंबईत विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाने (बेस्ट) त्यांच्या एका अभिनव मोहिमेमध्ये, ‘पुढे चला’ या अभियानांतर्गत दोन ब्रँड चित्रफीत सादर केल्या आहेत. चित्रपट निर्माते अभिनय देव यांची निर्मिती असलेल्या या चित्रफितीमध्ये माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेता अनिल कपूर यांनी त्यांच्या बेस्ट बसमधील प्रवासाच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन प्रोत्साहन दिले आहे.

सर्व मुंबईकरांप्रमाणेच सचिन तेंडुलकर आणि अनिल कपूर यांच्या आयुष्यातदेखील बेस्टने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या चित्रफितींमध्ये त्यांनी पुन्हा बेस्ट प्रवासाचा अनुभव घेतला आहे. क्रिकेटच्या सरावासाठी शिवाजी पार्कवर वेळेवर पोहोचण्यासाठी आपण भल्या सकाळी कशी बस पकडत होतो, याविषयीच्या तेंडुलकर यांनी सांगितले आहे; तर मुंबईमधील स्टुडिओमध्ये व ऑडिशन्सकरिता जाण्यासाठी चेंबूर येथील घरापासून आपण कसे बसने जात होतो, या विषयीच्या आठवणी अनिल कपूर यांनी चित्रफितीमध्ये जागवल्या आहेत.

बेस्टने त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी आणि त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी मदत केली असे सांगत, बेस्ट आता स्वतः तिच्या नवीन डिजिटल बस सेवांसह पुढे जात आहे या गोष्टीवर प्रकाश टाकला आहे.

Web Title: Mumbai Best Pudhe Chala Digital Campaign

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top