वीज बिलाविरोधात भाजप आक्रमक, मुंबईत अनेक भागात कार्यकर्त्यांचा ठिय्या

वीज बिलाविरोधात भाजप आक्रमक, मुंबईत अनेक भागात कार्यकर्त्यांचा ठिय्या

मुंबई: भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीज बिलावरून राज्यात ठाकरे सरकार विरोधात आंदोलन छेडण्यात आले आहे. वाढीव वीज बिलाविरोधात भाजप आक्रमक झाली असून राज्यातील वीज केंद्राबाहेर कार्यकर्त्यानी जोरदार घोषणा करत आघाडी सरकार विरोधात नारेबाजी केली आहे. 

आघाडी सरकारने वीज बिलात नागरिकांना सवलत द्यावी अशी मागणी करत आज भाजपा कार्यकर्त्यानी आंदोलन केले आहे. लॉकडाऊन असताना सरकारने सामान्यांना वीज बिलाबाबत आश्वासन दिले होते.  मात्र अदानीकडून येणाऱ्या वाढत्या बिलाबाबत सरकार कोणतीच ठोस भूमिका घेत नाही. अनेकांच्या लॉकडाऊनमध्ये नोकरी व्यवसायावर परिणाम झालेला असताना अनेकांचे वाढीव वीज भरले नाही म्हणून अदानीकडून ते कापण्यात येत आहे. 

सरकार सामन्यावर अन्याय करत आहे आणि सामन्यावर होणार अन्याय आम्ही सहन करणार नाही सरकारला वीज बिलाबाबत निर्णय घ्यावाच लागेल असे नगरसेवक सूर्यकांत गवळी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. यावेळी ईशान्य मुंबई उपाध्यक्ष चंद्रकांत मालकर,  नगरसेविका बिंदू त्रिवेदी , माजी नगरसेविका रितू तावडे आदीसह  शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव कडक बंदोबस्त तैनात केला आहे.

याव्यतिरिक्त भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही  महावितरण कार्यालय भांडुप पश्चिम येथे टाळे ठोको आंदोलनात सहभाग घेतला आहे.  तसंच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कांदीवलीत आंदोलन केलं. तर भाजपकडून वांद्रा आणि चेंबूर येथेही आंदोलन करण्यात आलं आहे.

---------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai bjp workers protest Against Increased electricity bills ghatkoper bandra

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com