मुंबईतील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजारांपार

मुंबईतील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजारांपार
Updated on

मुंबई : मुंबईमध्ये गेल्या 24 तासांत 6 हजार 923 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 98 हजार 674 इतका झाला. आजच्या दिवसात 8 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृत्युंची संख्या 11 हजार 649 वर पोहोचली. ताज्या आकडेवारीनुसार, सध्या मुंबईत 45 हजार 140 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकूण 3 लाख 40 हजार 935 लोक या आजारूतून पूर्ण बरे झाले आहेत. त्यामुळे रूग्ण बरे होण्याचा दर 86 टक्के इतका आहे.

राज्याची परिस्थितीही बिकट

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात आज नवे 40 हजार 414 कोरोनाबाधित आढळले. गेल्या 24 तासात एकूण 17 हजार 874 कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले, पण 108 रूग्णांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. आजची आकडेवारी एकत्रित करून एकूण 23 लाख 32 हजार 453 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले. सध्या राज्यात एकूण 3 लाख 25 हजार 901 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.95% इतके झाले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांचा नागरिकांना इशारा

आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कोविड टास्क फोर्समधील पदाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज एक बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना लॉक़डाउनच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले. जर कोरोनाला रोखण्यासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे नागरिकांकडून अशाचप्रकारे उल्लंघन होत राहिले, तर राज्यात लॉकडाउन सदृश निर्बंध लादावे लागतील असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

एकीकडे आपण कोविड परिस्थितीत अर्थव्यवस्था सुरु राहील याचा पुरेपूर प्रयत्न करतो आहे. पण अनेक लोक अजूनही कोरोना ही बाब गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खाजगी कार्यालयांतून उपस्थिती नियमांचे पालन केले जात नाही. विवाह समारंभात घालून दिलेल्या नियमांची थेट पायमल्ली सुरू आहे. बाजारपेठांमध्येही काहीशी तशीच परिस्थिती आहे. सुरक्षित अंतर ठेवणे, हात धुणे आणि मास्कचा वापर करणे या प्राधान्यक्रमाने करण्याच्या गोष्टी योग्य पद्धतीने पाळल्या जात नाहीत. त्यामुळे अखेर लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्यालाच विचार करावा लागणार आहे, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com