Covid-19-vaccine
Covid-19-vaccine

Coronavirus: लसीकरणाबाबत मुंबई महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय

देशभरात राबवण्यात येणाऱ्या लसीकरण मोहीमेला चालना देण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवली आहे. आधी केवळ १० लसीकरण केंद्र मुंबईत होती. पण आता ही संख्या ९१पर्यंत वाढवण्यात आली आहे. १६ जानेवारीपासून आतापर्यंत लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. लसीकरणाबाबत अपेक्षित जागरूकता न झाल्यामुळे आणि काही गैरसमजुतींमुळे या मोहिमेला मुंबईत अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. तशातच ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरापासून दूर असलेल्या लसीकरण केंद्रांवर पोहोचण्यासाठी अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोविड-19च्या केसेसमध्ये झालेल्या वाढीमुळे ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला. कारण, त्यांच्यात रोग प्रतिकारशक्तीची कमतरता आणि संक्रमणाचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत सर्वांना सोयीचा ठरेल असा पर्याय म्हणून लसीकरण केंद्र वाढवण्यात आली. पालिकेचे रोज एक लाख रोगप्रतिबंधक लस टोचण्याचे लक्ष्य आहे. मात्र आरोग्यसेवक, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोक असे तीन गट मिळून सध्या ४५ हजार एवढीच संख्या गाठता आली आहे.

8 मार्च रोजी 65 केंद्रांत 40,502 लसीकरण केले गेले. तर, 9 मार्च रोजी हा आकडा वाढून 68 केंद्रांत 43,581 पर्यंत वाढले आहेत. 10 मार्च रोजी 71 केंद्रांवर 42,702 लोकांचे लसीकरण झाले. 11 मार्च रोजी 72 केंद्रांवर ही संख्या घटून 36,933 लाभार्थ्यांना लसीकरण झाले, तर दुसर्‍या दिवशी लाभार्थ्यांची संख्या 77 केंद्रांवर 44,264 वर गेली. त्यानंतर,  77 केंद्रांवर लसीकरण वाढून 45,050 पोहोचले. 15 मार्च रोजी केंद्रांची संख्या वाढून 85 झाली, तर लाभार्थ्यांची संख्या घसरून 44,683 झाली. त्याच्या दुसर्‍या दिवशी 89 केंद्रांवर लसीकरण घसरून 42,534 पर्यंत कमी झाले. 17 मार्च रोजी 91 लसीकरण केंद्रांवर, 38,369 लाभार्थ्यांचे लसीकरण झाले ज्यात 10 टक्के घट नोंदवण्यात आली.

"आधी लसीकरणाची संख्या ५० टक्क्यांपर्यंत होती. आता काही दिवसांत लसीकरणाने जोर धरला आहे. लसीबाबत कोणताही गैरसमज बाळगण्याची आवश्यकता नाही. लोकांनी लस घेऊन स्वतःला आणि इतरांनाही सुरक्षित करायला हवं व त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा", असं आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केलं. "लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन्ही लस उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे, लोकांना त्यांच्या सोईनुसार लस घेता येऊ शकेल. शिवाय, सोशल मीडिया, पत्रिकेद्वारे इतर माध्यमांमधून लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे", असेही काकाणी यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com