सतीश कौशिक यांच्या निधनाने अष्टपैलू कलाकार हरपला| Mumbai Bollywood artist lost Satish Kaushik Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satish kaushik

Mumbai News : सतीश कौशिक यांच्या निधनाने अष्टपैलू कलाकार हरपला !

मुंबई : सतीश कौशिक यांच्या निधनाने अष्टपैलू कलाकार हरपला आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सतीश कौशिक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.

मुनगंटीवार आपल्या शोक संदेशात म्हणतात, एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच ते स्क्रिप्ट रायटर, दिग्दर्शक आणि निर्माता देखील होते. मिस्टर इंडिया या चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली. राम लखन, साजन चले ससुराल अशा अनेक चित्रपटात त्यांनी आपल्या कसदार अभिनयाची झलक दाखवून रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केले.

सतीश कौशिक यांचं वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी प्रत्येक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, त्यांच्या विनोदी भूमिका अधिक गाजल्या. त्यांच्या विनोदी भूमिका आजही लोकप्रिय आहेत आणि कायम राहतील, असे सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे. सतीश कौशिक यांच्या निधनामुळे भारतीय सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. सतीश कौशिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली !