
Gold Crime: मुंबईच्या बोरिवली परिसरातून एका धक्कादायक चोरीचा प्रकार समोर आला आहे. देशभरात सोने विक्री करणाऱ्या 'जे.पी. एक्सपोर्ट गोल्ड अॅण्ड डायमण्ड ज्वेलरी' या नामांकित सराफी पेढीला तब्बल १३.३४ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या पेढीत काम करणाऱ्या एका सेल्समननेच विक्रीसाठी दिलेले तब्बल १३ किलो सोने लंपास केल्याचे उघड झाले आहे.