esakal | धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ; रेणू नंतर करुणा शर्माने केला गंभीर आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ; रेणू नंतर करुणा शर्माने केला गंभीर आरोप

धनंजय मुंडेंनी ज्या महिलेसोबत संबंध असल्याचं मान्य केलं होते. त्या करुणा शर्मा यांनीच आता एकदा तक्रार केली आहे.

धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ; रेणू नंतर करुणा शर्माने केला गंभीर आरोप

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे  यांच्याविरोधात आता आणखी एक तक्रार केली झाली आहे. धनंजय मुंडेंनी ज्या महिलेसोबत संबंध असल्याचं मान्य केलं होते. त्या करुणा शर्मा यांनीच आता एकदा तक्रार केली आहे. यापूर्वी करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी तक्रार केली होती. मात्र त्यांनी ती तक्रार मागे घेतली होती.  

करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांच्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट बंगल्याच्या मागच्या खोलीत 3 महिन्यापासून कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  20 फेब्रुवारीला त्या  मुलांना भेटण्यासाठी जाणार आहे. त्यानंतरही मुलांचा ताबा मिळाला नाही. तर त्या उपोषण करणार आहेत.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

करुणा शर्मा यांनी असाही आरोप केला आहे की त्यांना त्यांच्या मुलांना भेटू दिले जात नाही. धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे सबंध असून त्यातून त्यांना दोन मुले झाल्याचं याआधी मंत्री धनंजय मुंडे यांनी मान्य केलं होते. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची करुणा शर्मा यांची मागणी आहे.

करुणा शर्मा यांची गंभीर तक्रार आहे. करुणा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर आपल्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट बंगल्याच्या मागच्या खोलीत 3 महिन्यापासून कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Mumbai breaking marathi Karuna Sharma has a serious complainton Dhananjay Munde

loading image