esakal | मुंबईत तिसऱ्या स्तराचेच निर्बंध लागू; ग्राहकांची ठाणे, नवी मुंबईकडे धाव
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत तिसऱ्या स्तराचे निर्बंध; ग्राहकांची ठाणे, नवी मुंबईकडे धाव

मुंबईत तिसऱ्या स्तराचे निर्बंध; ग्राहकांची ठाणे, नवी मुंबईकडे धाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राज्य सरकार, पालिकेच्या भूमिकेमुळे मुंबईतील व्यवसाय डबघाईला आल्याचा व्यापारी संघटनेचा आरोप

मुंबई: शहरात कोरोना नियंत्रणात येत असून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने अद्यापही तिसऱ्या स्तराचेच निर्बंध कायम ठेवले आहेत. परंतु, शेजारील ठाणे, नवी मुंबई शहरातील निर्बंध उठवल्याने मुंबईतील नागरिक तेथे जाऊन विविध गोष्टींची खरेदी करत आहेत. असे असताना इतर शहरांच्या तुलनेत मुंबईलाच दुजाभाव देण्याचा हेतू काय? असा प्रश्न व्यापारी संघटनांनी ठाकरे सरकारकडे केला आहे. (Mumbai Businessmen angry on Uddhav Thackeray Govt and BMC because of lockdown restrictions)

हेही वाचा: मालाडमध्ये केकमधून ड्रग्सची विक्री; कॉलेजचा विद्यार्थी अटक

राज्य सरकारने जारी केलेल्या कोरोना संदर्भातील मार्गदर्शक तत्वांनुसार कोरोनाचा फैलाव आटोक्यात येत आहे. वास्तविक मुंबई ही मागील आठवड्यापासून पहिल्या-दुसऱ्या टप्प्यात येऊ पाहत आहे. मात्र, मुंबईतील नागरिकांची वर्दळ पाहता खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने मुंबईला तिसऱ्याच टप्प्यात ठेवले आहे. त्यामुळे मुंबईवर निर्बंधांची टांगती तलवार कायम आहे. मुंबई शेजारच्या ठाणे, नवी मुंबई येथील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावर राज्य सरकारने या शहरांना पहिल्या-दुसऱ्या टप्प्यात ठेवत निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र, मुंबई अद्यापही निर्बंधमुक्त झालेली नाही. त्यामुळे शहरा-शहरांमध्ये राज्य सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी केला आहे.

हेही वाचा: प्रताप सरनाईकांच्या पत्रावर संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया

पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेड्सच्या उपलब्धेनुसार मुंबईला पहिल्या किंवा दुसऱ्या घेणे वावगं ठरणार नाही. परंतु, महापालिकेने कोरोनाचा धोका लक्षात घेता मुंबईला तिसऱ्याच टप्प्यात ठेवले आहे. शेजारच्या शहरांमध्ये निर्बंध शिथिल केल्याने तेथील व्यवसायाला चालना मिळत आहे. मुंबईतील व्यवसायिकही तेथे येऊ पाहत आहेत. मुंबईतच दुकाने व हॉटेल दुपारी चारनंतर बंद होत असल्याने व्यवसायाचे मोठे नुकसान होत आहे. राज्य सरकारकडून इतर शहरांच्या तुलनेत मुंबईबाबत पक्षपाती भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे मुंबईतील व्यवसाय डबघाईला आला आहे. याविषयी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन व्यापारी संघटनांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी विरेन शहा यांनी केली आहे.

हेही वाचा: देव तारी त्याला... अख्खी ट्रेन वरून गेली पण बचावली महिला!

मुंबईत दुकानांवर निर्बंध आहेत.फेरीवाल्यांना आणि इ कॉमर्स विक्रेत्यांना मात्र निर्बंध नाहीत.त्यामुळे मुंबईच्या हॅाटेलांतून आणि दुकांनातूनच कोरोनोचा फैलाव होतो,असे राज्य सरकारने गृहीत धरले आहे का?असा सवालही व्यापारी संघटनांनी उपस्थित केला आहे.मुंबईला पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात सामिल करावे,अशी आग्रहाची मागणी व्यापारी संघटनांनी राज्य सरकारकडे केली आहे.

loading image
go to top