भायखळा कारागृहात 4 मुलांसह 43 महिला कैद्यांना कोरोनाची लागण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 corona infected

भायखळा कारागृहात 4 मुलांसह 43 महिला कैद्यांना कोरोनाची लागण

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील (Mumbai) कोरोना रुग्णांची संख्या (corona patients) आटोक्यात आली होती. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पण भायखळा तुरुंगात (byculla jail) कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. मागील दहा दिवसांत 43 महिला कैद्यांना कोरोनाची लागण (prisoners infection) झाली आहे. यामध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे. तर काही गर्भवती महिलाही आहेत.

हेही वाचा: मुंबईतील कोरोना गंभीर रुग्णांची संख्या दुपटीने कमी

हे सर्व रुग्ण गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या तपासणीत सापडले आहेत. पालिका ई-वॉर्डच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 600 हून अधिक कैद्यांची तपासणी करण्यात आली आहे. या सर्वांना पालिकेने तुरुंगाजवळील पाटणवाला शाळेत क्वारंटाईन केले आहे. 10 दिवसांपूर्वी भायखळा कारागृहात एक महिला कैदी कोरोना बाधित आढळली. यानंतर, पालिका ई वॉर्डद्वारे तेथे एक तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. ई-वॉर्डचे आरोग्य अधिकारी डॉ शैलेंद्र गुजर यांनी सांगितले की, 16 सप्टेंबर रोजी भायखळा कारागृहात एका कैद्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर स्क्रीनिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान 6 महिला कैद्यांना ताप आला होता.

या महिलांच्या तपासादरम्यान 3 महिला कैद्यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. यानंतर, 18 सप्टेंबर रोजी 97 कैद्यांची तपासणी करण्यात आली ज्यात 4 महिलांसह 36 महिला कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. डॉ. गुजर म्हणाले की, 250-250 महिला कैद्यांची दोन टप्प्यात तपासणी करण्यात आली ज्यात 4 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत येथे 10 दिवसांत 43 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना कारागृहाजवळील पाटणवाला शाळेत अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. नायर रुग्णालयात कोरोना बाधित मुलांची नियमित तपासणी केली जात आहे. एका गर्भवती महिलेला खबरदारीचा उपाय म्हणून जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

loading image
go to top