esakal | मुंबई : सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी
sakal

बोलून बातमी शोधा

solar energy

मुंबई : सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महानिर्मिती कंपनीच्या राज्यातील विविध जागांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. तसेच महानिर्मितीकडून भाग भांडवल उपलब्ध करून देण्यासही मान्यता दिली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. १८७ मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पांसाठी तसेच ३९० मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी दोन स्वतंत्र प्रस्तांवाना मान्यता दिली. कौडगाव (जि. उस्मानाबाद), सिंदाला- लोहारा (जि, लातूर), भुसावळ, परळी, कोरडी, नाशिक आणि साक्री (जि. धुळे) असे एकूण १८७ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

या प्रकल्पांकरिता करार करण्यास मान्यता देण्या त आली. प्रस्तावित ३९० मेगावॉट क्षमतेच्या सौर प्रकल्पांसाठी एक हजार ५६४ कोटी २२ लाख रुपये खर्चासाठी केएफडब्लू बँकेकडून कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली.

अन्य निर्णय

  • गोरेगावमधील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास

  • पुनर्विकास केल्यावर ३३ हजार गाळे उपलब्ध

  • प्रकल्पास ‘विशेष प्रकल्पाचा दर्जा’ देण्याचा निर्णय

loading image
go to top