मुंबई
Mumbai: भटक्या श्वानांसाठी मुंबईकरांचा कॅण्डल मार्च; वाचा नक्की काय आहे प्रकरण
Kandivali: भटक्या कुत्र्यांच्या हत्येप्रकरणी कारवाई करण्याची मागणी
कांदिवली पश्चिमेतील साई नगर, मंगलमय सोसायटीच्या बाहेर तब्बल १४ भटक्या श्वानांची क्रूर हत्या करून गोणीमध्ये भरून त्यांना नाल्यात फेकण्यात आले होते. याबाबत श्वानप्रेमींच्या प्युअर ॲनिमल लवर (पाल) संस्थेच्या वतीने कॅण्डल मार्च काढण्यात आला. श्वानांना मारणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

