
मुंबई - मध्य रेल्वेने पर्यावरणातून ऊर्जा निर्मितीची कास धरली आहे. मध्य रेल्वे सुद्धा २ हजार ६९४ एकर जमिनीवर सोलर प्लांट बसविण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणता विजेची बचत होणार आहे, विशेष म्हणजे २ हजार ६९४ एकर जमीन ही रेल्वेचा वापरात नसलेल्याने ह्यावर सोलर प्लांट उभारण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
एलईडी दिवे, सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणाचा वापर गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेकडून मोठ्या प्रमाणात करत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत होत आहे. आता मध्य रेल्वे सुद्धा २ हजार ६९४ एकर जमिनीवर सोलर प्लांट बसविण्याचा निर्णय घेतला आहे,
त्यामुळे मोठ्या प्रमाणता विजेची बचत होऊन मध्य रेल्वेने जूनपर्यंत अनेक स्थानकांवर सौर रूफटॉप प्लांट बसवून शाश्वत ऊर्जेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सौरऊर्जेचा वापर करणे आणि अक्षय ऊर्जेचा वापर करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
८१ ठिकाणी १ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प
मध्य रेल्वेने आपल्या नेटवर्कमध्ये ८१ ठिकाणी १ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी कंत्राटे दिली आहेत. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रेल्वेच्या सौरऊर्जा क्षमतेत आणखी वाढ करेल. याशिवाय, मध्य रेल्वेने नागपूर विभागातील नवीन इलेक्ट्रिक लोको शेड अजनी येथे १ मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाची निविदा यशस्वीपणे जिंकली आहे.
पॉवर पर्चेस एग्रीमेंट (PPA) द्वारे, प्लांट स्वच्छ ऊर्जा निर्माण करेल आणि अपारंपरिक संसाधनांवर रेल्वेचे अवलंबित्व कमी करण्यात योगदान देईल. याशिवाय, मध्य रेल्वेने पुणे विभागात १ मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प पीपीए मोडद्वारे विकसित करण्याची योजना आखली आहे.
वापरात नसलेल्या जमिनीवर सोलर प्लांट-
सोलर प्लांट बसवण्याच्या सोयीसाठी, मध्य रेल्वेने सुमारे दोन हजार ६९४ एकर मोकळी किंवा वापरात नसलेली रेल्वे जमीन निवडली आहे. या स्थानांमध्ये सौर पायाभूत सुविधांच्या विकासाची प्रचंड क्षमता आहे आणि त्यामुळे रेल्वेचा कार्बन फूटप्रिंट आणखी कमी होण्यास मदत होईल. पर्यावरणीय कामगिरी वाढवण्यासाठी मोठी मदत होणार आहे
या स्थानकांवर बसवले सौर रूफटॉप प्लांट-
सोलापूर विभाग -
उस्मानाबाद - २०
किलोवॅट,बार्शी शहर - १५
किलोवॅट,वाडसिंगे - १०
किलोवॅट, सलगरे - १५
किलोवॅट, पारेवाडी - १० किलोवॅट,
मोहोळ - १० किलोवॅट
- तिलाती - १० किलोवॅट,
नागपूर विभाग-
काला आखर - ५ किलोवॅट,
पोला दगड - १० किलोवॅट,
मरमझिरी - १० किलोवॅट
मरामझिरी -१० किलोवॅट,
जौलखेडा - ५ किलोवॅट ,
दोडारामोहर - ५ किलोवॅट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.