Churchgate Hostel Rape Murder Case : मुंबईत वसतीगृहात बलात्कारानंतर तरुणीची हत्या? आरोपी सुरक्षा रक्षकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ

मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद
Mumbai Police outside the Churchgate girls hostel
Mumbai Police outside the Churchgate girls hostelsakal

मुंबई : मुंबईतील चर्चगेट भागातील सावित्रीबाई फुले वसतिगृहमध्ये 21 वर्षीय मुलीवर बलात्कार व हत्या झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

वसतिगृहातील राहत्या खोलीत मुलीचा मृतदेह मंगळवारी नग्न अवस्थेमध्ये सापडला आहे. पिडीत मुलगी मूळची अकोल्याची असून बांद्रातल्या एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये शिकण्यासाठी मुंबईत आली होती.

जवळपास मंगळवारी संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास घटना उघडकीस होताच  मरीन ड्राईव्ह पोलिसाना सांगण्यात आले. त्वरित पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले . मुंबईहून दोन दिवसानंतर आपल्या घरी जाण्यासाठी पिडीत मुलगी तयारीत असल्याची माहिती मिळत आहे . 

Mumbai Police outside the Churchgate girls hostel
Mumbai Crime : बायकोने आईची बाजू घेतल्याने संतापला नवरा! पतीने रागाच्या भरात उचलले टोकाचे पाऊल, पण...

आश्चर्यकारक म्हणजे या वसतीगृहाचा वॉचमन प्रकाश कनोजिया घटनेनंतर त्याचा मोबाईल इमारतीत सोडून फरार झाल्याची माहिती मिळत होती. मरीन ड्राईव्ह पोलीसांचे एक पथक एक पथक सुरक्षा रक्षकाच्या मागावर होते. रात्री उशिरा आरोपी सुरक्षा रक्षकाचा मंगळवारी चर्नीरोड- ग्रान्डरोड स्थानकांच्या दरम्यान रेल्वे रुळावर मृतदेह सापडला. आरोपीचाच मृतदेह सापडल्यामुळे या प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं आहे.   

Mumbai Police outside the Churchgate girls hostel
Crime News : गळ्यात खुपसलेला सूरा घेऊन रुग्णालयात, डॉक्टरांनाही बसला धक्का

.प्राथमिक अंदाजानुसार या घटनेमध्ये बलात्कारची  शक्यता वर्तवली जात आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस वैद्यकीय अहवालाच्या प्रतीक्षेत असून प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. याविषयी बोलताना सहायक पोलीस निरीक्षक अमोल पवळे यांनी 

मृतदेहाला उत्तरीय तपासणीसाठी पाठवल्याचं सांगितलं. सध्यातरी हा हत्येचा प्रकार वाटत आहे.पोस्टमोर्टेम अहवालानंतर  जे कारण येईल त्या नंतर पोलीस तपासाची दिशा स्पष्ट होईल. सध्या चौकशी सुरु आहे अशी माहिती त्यांनी दिली.

Mumbai Police outside the Churchgate girls hostel
Akola Crime : १५ छायाचित्रकारांचे कॅमेरे नेले भाड्याने, परत दिलेच नाही! आरोपीविरोधात तक्रार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com