मुंबईकरांनी थकवली कोट्यवधींची पाणीपट्टीची; BMCकडून टप्प्याटप्प्याने वसुली

समीर सुर्वे
Tuesday, 26 January 2021

पाणीपट्टीच्या थकबाकीदारांना दंडाच्या रक्कमेत सूट देऊनही गेल्या वर्षी अवघी 6.86 टक्के थकबाकी वसूल झाली आहे

मुंबई  : पाणीपट्टीच्या थकबाकीदारांना दंडाच्या रक्कमेत सूट देऊनही गेल्या वर्षी अवघी 6.86 टक्के थकबाकी वसूल झाली आहे. पाणीपट्टी पोटी महानगर पालिकेची तब्बल दोन हजार 819 कोटी 44 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यातील फक्त 193 कोटी 42 लाख रुपयांची वसुली झाली आहे. त्यामुळे आता सर्व थकबाकी एकाच वेळी भरण्याऐवजी टप्प्याटप्प्याने थकबाकी भरण्याची मुभा देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. दहा वर्षांत पाणीपट्टीच्या धकबाकीत तिपटीहून अधिक वाढ झाली आहे. 

पाणीपट्टीच्या थकबाकी वसुली करण्यासाठी महानगर पालिका दरवर्षी अभय योजना राबवून थकबाकीवरील दंडाच्या रक्कमेत सूट देते. 2010-11 या वर्षात पाणीपट्टी 782 कोटी 68 लाख रुपयांची थकबाकी होती. अभय योजनेअंतर्गत 246 कोटी रुपयांची वसुली झाली होती. ही योजना या वर्षात 123 दिवस सुरू होती. तर,2014-15 मध्ये थकबाकी एक हजार 11,971 कोटी रुपयांवर पोहचली. त्यावर्षी 159 दिवसांच्या अभय योजनेच्या काळात 234 कोटी 87 लाख रुपयांची वसुली झाली. तर,2020 मध्ये अभय योजना 365 दिवसांपैकी 289 दिवस सुरु होती. मात्र, प्रत्यक्षात 193 कोटी 42 लाख रुपयांची वसुली झाली. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

सुरवातीला मे 2020 पर्यंत असलेल्या अभय योजनेला कोविड काळात मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. पाणीपट्टी एकाच वेळी भरणे शक्‍य नसल्याने थकबाकी भरली जात नाही. मात्र, यंदा थकबाकी टप्प्या टप्प्याने भरण्याची परवानगी दिली आहे. 

सूट का? 

कोविड काळात निर्माण झालेल्या स्थितीचा परिणाम रोजगारावर तसेच उद्योग-व्यवसायांवर झाला आहे. त्यामुळे 100 टक्के थकबाकी भरणे शक्‍य होत नाही, असा अंदाज पालिकेने व्यक्त केला आहे. याशिवाय विविध सरकारी आणि निम सरकारी संस्थांना 100 टक्के निधी भरणे शक्‍य नसल्याने ही सूट देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेने या प्रस्तावात नमूद केले.

mumbai city news crore of rupees spent on water supply by Mumbaikars

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai city news crore of rupees spent on water supply by Mumbaikars