esakal | मुंबई वातावरण कृती आराखडा संदर्भात 200 सूचना-हरकती | Mumbai
sakal

बोलून बातमी शोधा

climate-change

मुंबई वातावरण कृती आराखडा संदर्भात 200 सूचना-हरकती

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : महानगराला वातावरणीय बदल (Climate change) सक्षम ब‍नविण्‍यासाठी मुंबई वातावरण कृती आराखडा बनविण्‍याचे काम प्रगतिपथावर असून यामध्‍ये 200 सूचना प्रशासनाकडे (Government) प्राप्त झाल्या आहेत. यापुढेही नागरिकांना अधिक सूचना, शिफारशी नोंदविता (notice of people) याव्‍यात, यासाठी या सुविधेस मुदतवाढ देण्यात आली आहे.

हेही वाचा: मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 405 नव्या रुग्णांची भर; तर 6 जणांचा मृत्यू

यासंदर्भातील सूचना , हरकती पाठवू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी mcap.mcgm.gov.in या संकेतस्‍थळावर सुविधा उपलब्ध आहे.मुंबई वातावरण कृती आराखडा बनविण्‍यासह त्‍यासाठीच्‍या संकेतस्‍थळाचा शुभारंभ राज्‍याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्‍हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडला होता. यानंतर, वातावरण बदल संदर्भातील तज्‍ज्ञ व भागधारकांशी सल्लामसलत करुन आराखडा बनविण्‍याच्‍या दृष्‍टीने कार्यवाही सुरु आहे. सध्‍याची कोविड संसर्गाची स्थिती लक्षात घेता, दूरदृश्‍य प्रणाली (व्‍ह‍िड‍िओ कॉन्‍फरन्सिंग) द्वारे ऑनलाईन चर्चासत्रे आयोजित करुन तज्‍ज्ञांसह नागरिकांशी चर्चा करण्‍यात आली आहे.

आराखड्याबाबत तज्ज्ञ व्यक्ती तसेच नागरिक यांना त्यांच्या सूचना, शिफारशी mcap.mcgm.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून पाठविण्यासाठी दिनांक 20 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार 200 प्रतिसाद प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. तथापि, अधिकाधिक नागरिक, तज्ज्ञ, संबंधित क्षेत्रातील संस्था यांना सूचना पाठविता याव्यात म्हणून या सुविधेस मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती.

त्याचा सकारात्मक विचार करुन प्रशासनाने https://mcap.mcgm.gov.in/talk-to-us/. या लिंकवर प्रतिसाद नोंदविण्यास मुदतवाढ दिली आहे.नागरिकांनी संकेतस्‍थळावर वातावरण बदलाशी निगडित सूचना, शिफारशी पाठवाव्यात असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्‍यात आले आहे.मुंबई वातावरण कृती आराखडा अंतर्गत संकल्पना आधारीत उपाय हे नोव्हेंबर 2021 पर्यंत म्हणजेच संयुक्त राष्ट्रे वातावरण बदल परिषद आयोजन कालावधीच्‍या आसपास तयार होण्याची शक्यता आहे.

loading image
go to top