
मुंबई आणि आसपासच्या परिसरात तापमान कमी राहणार आहे. शिवाय ही घट पुढील दोन ते तीन दिवसही कायम राहण्याची शक्यता आहे.
मुंबई : मुंबईत बुधवारी यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. माथेरान आणि मुंबईचा पारा 15.3 अंशांपर्यंत घसरला. सांताक्रूज वेधशाळेत 15.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कुलाब्यात किमान तापमान 18 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
सर्वात कमी तापमान 15.3 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्यामुळे बुधवारी हवेत गारठा होता. त्यापूर्वी 16 जानेवारीला सांताक्रूझ येथे किमान तापमान 16.6 अंश सेल्सियस नोंदवण्यात आले होते. त्याआधी, गेल्या वर्षी 22 डिसेंबर रोजी हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान 16 अंश सेल्सियस होते.
वेधशाळेच्या अंदाजानुसार तापमानातील घट ही उत्तरेकडून सुटणाऱ्या शीत वाऱ्यामुळे झाली. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरात तापमान कमी राहणार आहे. शिवाय ही घट पुढील दोन ते तीन दिवसही कायम राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती आयएमडीच्या पश्चिम विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिली.
मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्या वाचा एका क्लिक वर
दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला हवेची पातळी सुधारली होती. मात्र, बुधवारपासून पुन्हा एकदा हवेची गुणवत्ता खालावली. बुधवारी सकाळी संपूर्ण मुंबई शहराची हवा गुणवत्तेचा निर्देशांक (एक्यूआय) - 306 (अत्यंत निकृष्ट) प्रदूषक मापक निर्देशक-नोंदवला गेला. गेल्या आठवड्याच्या शेवटीही हवा गुणवत्ता अत्यंत खराब नोंदविण्यात आली होती आणि शनिवारी एक्यूआयची 320 आणि रविवारी 310 इतकी नोंद झाली होती; पण सोमवारी ती सुधारून (283) साधारण गटात आली होती
( संपादन - तुषार सोनवणे )
--------------------------------
Mumbai coldest temperature Record the lowest temperature of the season in mumbai