मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी दिल्लीत जोरदार लॉबिंग, बडे नेते तळ ठोकून

पूजा विचारे
Thursday, 17 December 2020

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी थेट दिल्लीतून जोरदार लॉबिंग सुरु झाल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे.

मुंबईः  मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी थेट दिल्लीतून जोरदार लॉबिंग सुरु झाल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षातही पक्ष वाढवण्याच्या हालचालींना वेग आल्याचं दिसतंय. 

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी मुंबईतल्या काही नेत्यांनी दिल्ली गाठली असल्याचं उघड झालं आहे. विद्यमान काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या ऐवजी अन्य कोण याबाबत लॉबिंग सुरु असल्याचं प्रयत्न दिसताहेत. मुंबईतील काँग्रेस नेते दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून आल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा-  मनसेकडून मुंबईभरात ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’चे पोस्टर

मुंबई महापालिका निवडणूकीआधी विद्यमान अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांची बदली व्हावी अशी भूमिका काही काँग्रेस नेत्यांची आहे. गायकवाड हे अध्यक्ष असले तरी तितके सक्रीय नाहीत. त्यामुळे त्यांच्या ऐवजी अन्य व्यक्तीची निवड व्हावी असा मतप्रवाह सध्या काँग्रेसच्या एका गटांचा आहे. मनपा निवडणुकीच्या काळात गायकवाड यांनी मुस्लिम आणि दलित मतदारांसाठी संघटनात्मक काम केल्याचा दावा हायकमांड समोर करण्यात आल्याचंही समजतंय.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

येत्या काही दिवसांमध्ये मुंबई प्रदेश काँग्रेस पातळींवर संघटनात्मक बदल होणं अपेक्षित आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या वडील एकनाथ गायकवाड यांच्यासाठी लॉबिंग करताहेत. तर अस्लम शेख हे अमरजित मनहंस यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. अशोक चव्हाण हे भाई जगताप यांच्यासाठी आग्रही आहेत.

Mumbai congress president lobbying delhi leaders eknath gaikwad bhai jagtap


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai congress president lobbying delhi leaders eknath gaikwad bhai jagtap