esakal | mumbai: मुंबईत ब्रेक थ्रूचा संसर्ग कमी
sakal

बोलून बातमी शोधा

corona

मुंबईत ब्रेक थ्रूचा संसर्ग कमी

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होत असून हे प्रमाण पालिकेच्या आकडेवारीनुसार अगदीच नगण्य आहे.  पालिकेच्या निरीक्षणानुसार, एक डोस झालेल्या 1000 नागरिकांपैकी फक्त 4 नागरिकांना ब्रेक थ्रू संसर्ग झाला आहे. मात्र, दोन डोस घेतलेल्यांना कोरोनाच्या ब्रेक थ्रुचा संसर्गाचा धोका कमी आहे. पालिकेने 1 फेब्रुवारी ते 03 ऑक्टोबरपर्यंतच्या काळात केलेल्या निरीक्षणानुसार दोन्ही डोस घेतलेल्या 1000 नागरिकांपैकी फक्त 2 नागरिकांना कोरोनाची लागण झाली. याचा अर्थ कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण खूप महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

मुंबईत कोरोना लसीचे

दोन्ही डोस घेतलेल्या जवळपास 0.23 टक्के लोकांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दोन्ही डोस घेतलेल्या 9 हजार 829 नागरिकांना कोविडची बाधा झाली आहे. पालिकेने 16 जानेवारीपासून मुंबईकरांचे कोविड 19 बचावापासून लसीकरण सुरू केले. फेब्रुवारीपासून नागरिकांना लसीकरणानंतरही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

हेही वाचा: Mumbai : आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी अडचणीत

पालिकेने 42 लाख 98 हजार 041 नागरिकांना लसीचे दोन्ही डोस दिले त्यातील 9,829 म्हणजेच 0.23 टक्के नागरिकांना कोरोनाचा ब्रेक थ्रू संसर्ग झाला तर, 39 लाख 57 हजार 268 नागरिकांना लसीचा पहिला डोस दिल्यानंतर त्यातील 15,451 म्हणजेच 0.39 टक्के नागरिकांना ब्रेक थ्रू इन्फेक्शन झाले.

पालिकेच्या म्हणण्यानुसार, कोविड सह इतर कोणत्याही व्हायरसपासून कोणतीच लस 100 टक्के सुरक्षा देऊ शकत नाही. पण, लस ही आजाराच्या संसर्गाची तीव्रता कमी करते. ज्यामुळे गंभीर आणि रुग्णालयात दाखल होण्याची किंवा आयसीयूची गरज पडत नाही .

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, कोरोनाचा ब्रेक थ्रू इन्फेक्शन होण्याचे प्रमाण 0.5 टक्क्यांपेक्षा कमी आहे. हजारांमध्ये 4 किंवा 2 नागरिकांना ब्रेक थ्रू संसर्ग झाला आहे. हे प्रमाण फारच कमी आहे. दोन्ही डोस घेणाऱ्यांपैकी फक्त 0.23 टक्के लोकांना कोरोनाचा त्रास झाला आहे. लस घेतल्यामुळे आजाराची तीव्रता कमी होते.

हेही वाचा: चंद्रपूर : अपघातात आजी ठार; तर नातू गंभीर

कोविड स्वभाव पाळलाच पाहिजे -

लस ही 100 टक्के सुरक्षित नाही. त्यामुळे, मास्क, सोशल डिस्टंसिंग आणि लसीकरण हे करुन घेतले पाहिजे असेही काकाणी यांनी सांगितले.

ब्रेक थ्रू इन्फेक्शन म्हणजे काय ?

लस घेतल्यानंतर कोरोनासंसर्ग झाल्याची प्रकरणं नवीन नाहीत. भ अनेकांना लसीचे दोन्ही डोस कोरोनासंसर्ग झाल्याचं समोर आलंय. कोरोनाविरोधी लस घेतल्यानंतरही झालेल्या कोरोनासंसर्गाला तज्ज्ञ 'ब्रेक-थ्रू इन्फेक्शन' म्हणतात. रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने ब्रेक-थ्रू संसर्ग होण्याचा धोका वाढतो. अॅन्टीबॉडीज कमी झाल्याने आजार गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो. मात्र, मुंबईत गंभीर प्रकरणे नोंदली गेली नाहीत.

loading image
go to top