esakal | चांगली बातमी! मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 103 दिवसांवर

बोलून बातमी शोधा

Corona patients
चांगली बातमी! मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 103 दिवसांवर
sakal_logo
By
मिलींद तांबे

मुंबई : कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईत लसीकरणासह कोरोना चाचण्यांवर भर देण्यात येत असून आतापर्यंत 54 लाख 90 हजार 241 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89 टक्के आहे. कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर 0.66 टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 103 दिवसांवर आला आहे. रविवारी 3672 नवीन रुग्ण सापडले असून कोरोनाग्रस्तांचा एकूण संख्या 6 लाख 56 हजार,204 इतकी झाली आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 57,342 हजारांवर आला आहे. नव्या रुग्णांची संख्या स्थिरावल्याने रुग्णवाढीचा दर 0.66 पर्यंत खाली आला आहे. 

मुंबईत रविवारी दिवसभरात 79 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 13 हजार 330 वर पोहोचला आहे. तर मृत झालेल्यापैकी 35 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 48 पुरुष तर 31 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 4 रुग्णांचे वय 40 वयोगटाच्या खालील होते.  32 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 43 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते. मुंबईत गुरुवारी 5542 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 5 लाख, 83हजार ,873 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 57हजार 342 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मुंबईत 107 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 903 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 24,195 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये  अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 894 करण्यात आले.  

धारावीतील 24 नवे रुग्ण

धारावीतील रुग्णसंख्यानियंत्रणात आली असून धारावीत आज 24 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 6497 वर पोहोचली आहे. दादर मध्ये आज 28 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 8939 झाली आहे. माहीम मध्ये 24 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 9037 इतके रुग्ण झाले आहेत.मुंबई प्रमाणे जी उत्तर मधील रुग्णसंख्या देखील  कमी झाली आहे. जी उत्तर मध्ये आज 76 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 24,473 झाली आहे.

संपादन : शर्वरी जोशी