esakal | मुंबईत कोरोनाची लाट ओसरण्याचे संकेत, नवीन रुग्णसंख्या दिलासादायक
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

मुंबईत कोरोनाची लाट ओसरण्याचे संकेत, सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई  : मुंबईत (Mumbai) आज गेल्या पाच महिन्यातील सर्वाधिक कमी कोरोनाबाधित रुग्णांची (Corona patient) नोंद झाली. आज 299 नवीन रुग्ण सापडले असून कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,34,418 इतकी झाली आहे. 9 फेब्रुवारी (February month) नंतर पाहिल्यांदाच इतकी कमी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. आज 501 रुग्णांनी कोरोनावर मात (Corona free patient) केली असून आतापर्यंत 7,10,849 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आतापर्यंत 79,90,319 कोरोना चाचण्या (Corona test) करण्यात आल्या. ( mumbai Corona patients very less compare to last five months- nss91)

रुग्ण संख्या कमी झाल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 1324 दिवसांवर गेला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दर ही 0.5 % पर्यंत खाली आला आहे.  नव्या रुग्णांपेक्षा आज बरे होणारे रुग्ण अधिक असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97 % पर्यंत गेले आहे. तर रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 5,397 हजारांवर आला आहे.

हेही वाचा: कोरोना लसीकरणाबाबत ठाकरेंच्या महापालिकेला सूचना, म्हणाले...

मुंबईत आज दिवसभरात 8 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 784 इतका झाला आहे. आज मृत झालेल्यापैकी 6 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 6 पुरुष तर 2 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी एका रुग्णाचे वय 40 वयोगटाच्या खालील होते. आणखी एका रुग्णाचे वय 40 आणि 60 च्या दरम्यान होते.तर 6 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते.

मुंबईत आजचा पॉझिटिव्हीटी रेट 1.19% आहे. 5 मे रोजी मुंबईतील पॉझिटिव्हीटी रेट 10.96% होता. मुंबईत केवळ 3 सक्रिय कंटेंटमेंट झोन असून 60 सीलबंद इमारती आहेत. गेल्या 24 तासांत 1,717 अति जोखमीचे संपर्क समोर आले असून 823 जणांना कोविड काळजी केंद्र 1 मध्ये दाखल करण्यात आले आहे.

loading image
go to top