मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 388 नव्या रुग्णांची भर; 4 जणांचा मृत्यू

corona update
corona updatesakal media
Updated on

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट (corona second wave) रोखण्यात पालिकेला (bmc) यश आले असतांनाच आता पुन्हा एकदा रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. आज दिवसभरात (Mumbai corona update) मुंबईत 388 नवीन कोरोना बाधित रुग्णांची (corona new patient) नोंद झाली. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7,43,153 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 4 रुग्णांचा मृत्यू (corona deaths) झाल्याने मृतांचा आकडा 15,972 वर पोहोचला आहे.

corona update
हरयाणात आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज; शरद पवार म्हणतात...

दरम्यान, दिवसभरात 288 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,21,759 रुग्ण कोरोनामुकत झाले आहेत. त्यामुळे मुंबईत सध्या 2,974 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान आज 37,335 चाचण्या केल्या असून आता पर्यंत 91,33,628 एवढया चाचण्या झाल्या आहेत.मुंबईतील बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टकके असून कोविड वाढीचा दर 0.04 टक्के आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 1713 दिवस असा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com