मुंबईला दिलासा; कोरोनाच्या शून्य मृत्यूची नोंद

corona update
corona updatesakal media

मुंबई : आज कोरोनामुळे एकही रुग्ण दगावला (no corona deaths) नाही. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी केवळ 1 कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यूची नोंद झाल्यानंतर आज मृतांचा आकडा शून्य झाला. ओमिक्रॉन संसर्गाने (Omicron variant infection) चिंता वाढवली असल्याने मुंबईत शुन्य मृत्यूंची नोंद झाल्याने दिलासा मिळाला आहे. आज कोरोनाचे 256 नवीन रुग्ण (corona new patients) आढळले.

corona update
ठाणे : टोपीवरील 'किंग्स' नावाने केला चोरट्यांचा घात; दुकली अटकेत

नवीन रुग्ण वाढले असून कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 7,65,110 वर पोहोचली आहे. आज 221 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,44,370 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी झाली असून 1808 पर्यंत खाली आली आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 2592 दिवस झाला आहे.कोरोना बाधित रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून कोरोना वाढीचा दर देखील 0.02 पर्यंत खाली आला आहे.

आज शून्य कोविड बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,355 वर पोचला आहे. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.02 टक्के झाला आहे. आज दिवसभरात 44,380 कोविड चाचण्या केल्या गेल्या असून आतापर्यंत 1,28,45,686 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. 

कोविड सुरू झाल्यापासून दुसऱ्यांदा एकाही मृत्युची नोंद झाली नाही. मार्च 2020 मध्ये कोविड सुरू झाल्यानंतर यापूर्वी फक्त 17 ऑक्टोंबर 2021 रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर आज एकाही मृत्युची नोंद झालेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com