esakal | Mumbai Corona Virus: चिंता वाढली; मुंबईत रुग्णवाढ सुरूच, रुग्णवाढीचा दरही वाढला
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Corona Virus: चिंता वाढली; मुंबईत रुग्णवाढ सुरूच, रुग्णवाढीचा दरही वाढला

मुंबईत दैनंदिन रुग्णवाढ सुरूच असून कोविड रुग्णवाढीचा दर वाढून  0.23 इतका झाला आहे.

Mumbai Corona Virus: चिंता वाढली; मुंबईत रुग्णवाढ सुरूच, रुग्णवाढीचा दरही वाढला

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: मुंबईत दैनंदिन रुग्णवाढ सुरूच असून कोविड रुग्णवाढीचा दर वाढून  0.23 इतका झाला आहे. मंगळवारी 643 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 3,20, 531 झाली आहे. काल 501 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 3 लाख 681 रूग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत पर्यंत एकूण 31 हजार 64,211 कोविड चाचण्या करण्यात आल्या.

मुंबईत काल केवळ 3 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. एकूण मृतांचा आकडा 11 हजार 449 इतका झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा 94 टक्के इतका झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा दर खाली घसरला असून 305 दिवसांवर आला आहे. मुंबईत काल मृत झालेल्या रुग्णांपैकी 3 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेले सर्व रुग्ण पुरुष होते. तर तीनही मृतकांचे वय 60 वर्षा वर होते.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबईत 51 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 815 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 7 हजार 548 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. काल कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 401 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Corona Update rising covid 19 cases growth rate also increased