Corona Updates : बीएमसी कार्यालयात उद्यापासून मास्कसक्ती; आयुक्त इक्बाल चहल यांचा निर्णय

corona updates
corona updatesesakal

मुंबईः देशासह राज्यामध्ये कोरोना वरचेवर वाढतांना दिसून येत आहे. विशेषतः मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्याच अनुषंगाने आज मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी मास्कसक्तीचा निर्णय घेतला आहे.

आयुक्त इक्बाल चहल यांनी आज एक बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये महानगर पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क घालणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे.

बीएमसी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मास्क अनिवार्य करण्यात आलेला आहे. उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिली आहेत. मुंबई पालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये कोरोना वॉर्ड सज्ज ठेवण्यात आलेले आहेत. काही दिवसांपासून दररोज ८००च्या पुढे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.

रविवारी राज्यात ७८८ नवीन रुग्ण आढळले. एका जणाचा मृत्यू झाला आहे. राज्यात ४५८७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर आज ५६० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९८.१२ टक्के आहे.

तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात ५,३५७ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशात सक्रिय प्रकरणे ३२,८१४ वर पोहोचली असून ११ मृत्यूंसह मृतांची संख्या ५,३०,९६५ वर पोहोचली आहे.

गुजरातमध्ये तीन, हिमाचल प्रदेशमधील दोन आणि बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com