मुंबईकरांनो लसींचा आणखीन स्टॉक आलाय, आता कोरोना लसीकरणाची संख्याही आणखी वाढणार

भाग्यश्री भुवड
Saturday, 23 January 2021

शनिवारी 16 जानेवारीला बीकेसीतील जंम्बो कोविड सेंटरमधून लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली

मुंबई : कोरोनाला हरवणारी लस कधी उपलब्ध होणार, याबाबत जगभरातील संशोधक लस तयार करण्यात रात्रंदिवस झटत होते. अखेर पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटने लस तयार केली आणि लसीचा पहिला 1 लाख 39 हजार 500 चा साठा 13 जानेवारीला मुंबईत दाखल झाला. तर गुरुवार 21 जानेवारीला पहाटे 1 लाख 25 डोस पालिकेला उपलब्ध झाले असून पालिकेच्या परळ येथील पालिकेच्या एफ साऊथ वॉर्डमध्ये लसीची साठवणूक करण्यात असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. 

शनिवारी 16 जानेवारीला बीकेसीतील जंम्बो कोविड सेंटरमधून लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली आणि 16 जानेवारी या पहिल्या दिवशी 1,926 हेल्थकेअर वर्कर्संना लस टोचण्यात आली. तर मंगळवारी 1,597 व बुधवारी 1,728 लस टोचण्यात आली असून तीन दिवस राबवलेल्या लसीकरण मोहीमेत 4,251 हेल्थकेअर वर्कर्संना लस टोचण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. 

दरम्यान, आता लसीचा साठा 2 लाख 64 हजार 500 लस उपलब्ध झाल्या असून लवकरच लस टोचण्याचे प्रमाण वाढवण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. 

महत्त्वाची बातमी :  2 किलो 700 ग्रामचं गोल्डन घबाड हवाईमार्गे आलं मुंबईत आणि तरन्नुम खान, विशाल ओबेरॉय गेले थेट जेलमध्ये

10 लसीकरण केंद्रांवर 3,539 हेल्थकेअर वर्कर्संना टोचली लस - 

कोरोनावर उपयुक्त लस उपलब्ध झाली आणि शनिवारपासून लसीकरणाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. पालिकेने 9 लसीकरण केंद्रांवर 40 बुथ तयार केले होते. पालिकेचे 9 लसीकरण केंद्र व राज्य सरकारचे जे. जे.1 अशा 10 लसीकरण केंद्रावर आज दिवसभरात 3,539 हेल्थकेअर वर्कर्संना लस टोचण्यात आली. 

केंद्रनिहाय लसीकरणः 

शुक्रवार संध्याकाळी 6 वाजेपर्यंत परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयात 685, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात 301, मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात 378, विलेपार्लेचे डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात 368 वांद्रे येथील भाभा रुग्णालयात 271, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालयात 72, घाटकोपर राजावाडी रुग्णालयात 517, कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात 572 आणि बीकेसी भव्य कोविड सुविधा केंद्रात 350 तर जेजे रुग्णालयात 25 जणांना लस देण्यात आली होती. आज दिवसभरात एकूण 3,539 हेल्थकेअर वर्कर्संना लस टोचण्यात आली.

mumbai corona vaccination news new stock from serum institute arrived in mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai corona vaccination news new stock from serum institute arrived in mumbai