esakal | BMC : मुंबईत कोरोना लसीकरण उद्या बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

BMC : मुंबईत कोरोना लसीकरण उद्या बंद

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईतील कोरोना लसीकरण मोहिम (Corona Vaccination) उद्या शुक्रवार 10 सप्टेंबर 2021 रोजी बंद राहणार आहे. कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत नागरिकांना दोन्ही डोस देवून अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी महानगरपालिका (BMC) प्रशासनाच्या वतीने विशेष सत्र राबवण्यात येत आहेत. त्या दृष्टीने पुढील नियोजन करुन प्रशासकीय व तांत्रिक बाबींची (Technical management) पूर्तता करण्यात येत आहे. या कारणास्तव लसीकरण मोहिम (vaccination drive) बंद ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा: मागाठाणे वनविभागातील नागरिकांना घरगुती दराने वीज पुरवठा; उर्जामंत्र्यांचे निर्देश

दरम्यान, महानगरपालिकेकडे कोविड लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असून शनिवारी 11 सप्टेंबर 2021 रोजी लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु राहणार आहे. अधिकाधिक नागरिकांना कोविड लसीच्या दोन्ही मात्रा देवून लसीकरण पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. ज्ये‍ष्ठ नागरिकांसाठी ड्राइव्ह इन लसीकरण, अंथरुणास खिळलेल्या व्यक्तींचे त्यांच्या घरी जावून लसीकरण, एलजीबीटी समुदायातील नागरिकांसाठी विशेष लसीकरण केंद्र, दुसरा डोस असलेल्या‍ नागरिकांसाठी एक संपूर्ण दिवस विशेष सत्र असे विविध उपक्रम राबवताना सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचून कोविड लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे. फक्‍त महिलांसाठी विशेष कोविड लसीकरण सत्र राबवण्‍याचे देखील विचाराधीन आहे.

येत्या काळातील अशा विशेष लसीकरण मोहिमांचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करणे आणि सर्व संबंधित लसीकरण केंद्रांना आवश्यक सूचना देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे, येत्या शुक्रवारी कोविड लसीकरण बंद असून मुंबईकर नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

loading image
go to top