esakal | मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव आटोक्यात? शनिवारी दिवसभरात आढळले ५०० हून अधिक रुग्ण

बोलून बातमी शोधा

मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव आटोक्यात? शनिवारी दिवसभरात आढळले ५०० हून अधिक रुग्ण}

शनिवारी 529 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 3,13,431 झाली आहे. काल दिवसभरात केवळ 6 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव आटोक्यात? शनिवारी दिवसभरात आढळले ५०० हून अधिक रुग्ण
sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: शनिवारी 529 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 3,13,431 झाली आहे. काल 542 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,95,886 रूग्ण बरे होऊन घरी गेले. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मृत्यूंची नीचांकी नोंद झाली असून काल दिवसभरात केवळ 6 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. एकूण मृतांचा आकडा 11,413 इतका झाला आहे.

मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर हा 94 टक्के इतका झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा दर 496 दिवसांवर गेला आहे. कोविड रुग्णवाढीचा दर 0.14 इतका आहे. आतापर्यंत पर्यंत एकूण 29,98,180 कोविड चाचण्या करण्यात आल्या.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबईत काल मृत झालेल्या पैकी 5 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्या व्यक्तींपैकी 5 पुरुष तर 1 महिला होती. मृतांपैकी दोघांचे वय 40 ते 60 वर्षा दरम्यान होते तर चार रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते.

हेही वाचा- सुसाट वाहनांवर नियंत्रणाची गरज, कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करणार

मुंबईत 122 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 1,488 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 6,213 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. शनिवारी कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 407 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai corona virus cases update patients rises