मुंबईत कोरोनाचा भडका, बुधवारी दिवसभरात आढळले 'इतके' रुग्ण

मुंबईत कोरोनाचा भडका, बुधवारी दिवसभरात आढळले 'इतके' रुग्ण
Updated on

मुंबई: मुंबईत बुधवारी दिवसभरात 2 हजार 377 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आता पर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 लाख 49 हजार 958 एवढी झाली आहे.  काल 8 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदवण्यात आले. आता पर्यंत 11 हजार 547 मृत्यूची नोंद करण्यात आली. 

आतापर्यंत 32 लाख 7 हजार 54 या आजारातून बरे झालेले रुग्ण आहेत. 16 हजार 751 एवढे सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत.  मुंबईत काल 8 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. एकूण मृतांचा आकडा 11 हजार 547 इतका झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा 92 टक्के इतका झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा दर खाली घसरला असून 145 दिवसांवर आला आहे.

मुंबईत दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली  आहे. तर कोविड रुग्णवाढीचा दर वाढून 0.48 टक्के इतका झाला आहे. आतापर्यंत पर्यंत एकूण 36,14,528
कोविड चाचण्या करण्यात आल्या. 

मुंबईत काल मृत झालेल्या रुग्णांपैकी 8 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 7 पुरुष तर 1 महिला रुग्णांचा समावेश होता. 

मुंबईत 34 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 267 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 12 हजार 561 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. बुधवारी कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 553 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

-------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Corona Virus new active cases 2377 spike since October eight deaths

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com