Corona Virus: मुंबईत झपाट्यानं रुग्णवाढ, ७६ टक्के बेड्स फुल

Corona Virus: मुंबईत झपाट्यानं रुग्णवाढ, ७६ टक्के बेड्स फुल

मुंबई: कोविडची दुसरी लाट शिखर गाठू लागल्यावर महानगर पालिकेने मुंबईतील कोविड केंद्रांसह रुग्णालयातील बेड्‌ची संख्या वाढविण्यास सुरुवात केली. मात्र रुग्णसंख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. सध्या फक्त 24 टक्के म्हणजे 5 हजार 114 बेड्‌स रिक्त आहेत. आयसीयूचे फक्त 87 बेड्‌स आणि 30 व्हेंटीलेटर रिक्त आहेत. यात 17 वर्षापर्यंतच्या बालकांसाठी राखीव असलेले पेडिऍड्रीक आयसीयू फक्त एकच रिक्त आहे. 

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून महानगर पालिकेने रुग्णालयांसह कोविड केंद्रातील बेड्‌सची संख्या वाढविण्यास सुरुवात केली. शहरात रोज आढळणाऱ्या 80 टक्के बाधितांमध्ये कोणतीही लक्षणं नसतात. त्यामुळे त्यांना गृहविलगीकरणात राहता येत होते. सुरुवातीला उच्चभ्रू वस्त्यांमधील हे रुग्ण असल्याने मोठ्या घरामुळे त्यांना गृहविलगीकरणात राहता येत होते. पण आता लहान घरांमध्येही रुग्ण आढळू लागले आहेत. अशा परिस्थितीत गृहविलगीकरण करणे शक्‍य नसल्याने पालिकेने त्यांच्यासाठी कोविड केंद्राची संख्या वाढविण्यास सुरुवात केली आहे. 2 एप्रिल रोजी लक्षण नसलेल्या रुग्णांसाठी 4 हजार 614 बेड्‌स होते. तर 3 हजार 114 बाधित दाखल होते. तर 10 एप्रिल पर्यंत ही संख्या 6 हजार 136 बेड्‌ होते तर 4 हजार 7675 बाधित दाखल होते. 

कोविड केंद्राची संख्या वाढवली जात असताना रुग्णालयातील बेड्‌सही वाढविण्यात आले आहेत. खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांमध्ये 2 एप्रिल रोजी 14 हजार 769 बेड्‌स राखीव होते. त्यावर 11 हजार 644 रुग्णांवर उपचार सुरु होते.तर , 10 एप्रिल पर्यंतही संख्या 18 हजार 737 पर्यंत वाढविण्यात आले. मात्र रुग्णही तेवढ्याच संख्येनं वाढून त्यांची संख्या 15 हजार 86 पर्यंत पोहोचली आहे. 
 
कोविड केंद्रासाठी 14 हजार बेड्‌स राखीव

लक्षणं नसलेल्या रुग्णांसाठी महानगर पालिकेने 17 हजारहून अधिक बेड्‌सची क्षमता असलेले कोविड केंद्र राखून ठेवले आहेत. सध्या 39 कोविड केंद्र आहेत. मात्र गरज पडल्यास 10 दिवसात महानगर पालिका 141 केंद्र सुरु करु शकते. यात 41 केंद्र तीन ते चार दिवसात सुरु करता येतील. त्यात 4 हजार 475 बेड्‌स उपलब्ध होती. तर,100 कोविड केंद्र 10 दिवसात सुरु करता येतील त्यातून 14 हजार 258 बेड्‌स उपलब्ध होऊ शकतील, अशी माहिती महानगर पालिकेच्या डॅशबोर्डवर नमूद आहे. 

मुंबईत आजच्या तारखेला 30 व्हेंटीलेटर रिक्त आहेत. सध्या कोविड रुग्णांसाठी 1 हजार 273 व्हेंटीलेटर राखीव  तर 1 हजार 243 रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. 
  
87 व्हेंटीलेटर रिक्त
सामान्य आयसीयू उपलब्ध - 2 हजार 363 
रुग्ण 2 हजार 290 
17 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी उपलब्ध - 16 
रुग्ण -15 
नवजात बालकांसाठी उपलब्ध - 31 
रुग्ण 18 

कोविड केंद्र, रुग्णालयातील खाटांची उपलब्धता टक्‍क्‍यात 
लक्षण नसलेले रुग्णांचे कोविड केंद्र - 24 
डीसीएचसी रुग्णालये - 26 
डीसीएच - 12 
एकूण -21

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Corona Virus Updates 24 percent bed balance Single pediatric ICU

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com