मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर 93 टक्क्यांवर, तर रुग्ण दुपटीचा दर 332 दिवसांवर

मिलिंद तांबे
Wednesday, 16 December 2020

मुंबईत मंगळवारी 521 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 2 लाख 85 हजार 580 झाली आहे. तर काल 7 रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबई: मुंबईत मंगळवारी 521 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 2 लाख 85 हजार 580 झाली आहे. तर काल 7 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 10 हजार 995 वर पोहोचला आहे. काल 403 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2 लाक 64 हजार 851 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर वाढला असून तो 93 टक्के इतका झाला आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 332 दिवसांवर गेला आहे. तर 14 डिसेंबरपर्यंत एकूण 1,15,153 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.21 इतका आहे. 

मुंबईत काल नोंद झालेल्या 7 मृत्यूंपैकी 4 जणांना दीर्घकालीन आजार होते. मंगळवारच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 4  पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. मृत झालेल्यांपैकी 2 जणांचे वय 40 ते 60 वर्षा दरम्यान होते तर 5 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबईत 401 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 4 हजार 685 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 2 हजार 583 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोविड काळजी केंद्रात दाखल करण्यात येणा-यांची संख्या देखील वाढत असून मंगळवारी कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 469 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

हेही वाचा-  कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये सहाव्यांदा कपात; 700 रुपयांत होणार चाचणी, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

जी उत्तरमध्ये 11 नवे रूग्ण 
 
जी उत्तरमध्ये मंगळवारी 11 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. धारावीमध्ये  काल दिवसभरात 4 नवीन रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 3 हजार 760 इतकी झाली आहे. तर 13 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 
दादरमध्ये काल केवळ 5 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 4 हजार 694  इतकी झाली आहे. तर 131 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीममध्ये ही काल 2 नवीन रुग्णांची भर पडली असून रुग्णांची संख्या 4 हजार 483 इतकी झाली आहे. तर 241 एक्टीव्ह रूग्ण आहेत.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai corona virus updates cure rate is 93 per cent doubling rate is 332 days


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai corona virus updates cure rate is 93 per cent doubling rate is 332 days