मुंबईत तब्बल अडीच महिन्यांनंतर घडली 'ही' चांगली गोष्ट

mumbai
mumbaisakal
  • मुंबई पालिकेने केलेल्या उपाययोजनांना यश

मुंबई: शहरात मृतांचा आकडा नियंत्रणात (Death rate in control) आला असून दिवसभरात 7 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईतील (Mumbai) मृतांचा आकडा 15 हजार 73 इतका झाला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या अडीच महिन्यातील (Last 2.5 Months) ही मृतांची सर्वात नीचांकी संख्या आहे. दिवसभरात मृत्यू पावलेल्यांपैकी 6 रुग्णांना दीर्घकालीन (Long term Illness) आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 6 पुरुष तर 1 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 2 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 5 रुग्णांचे वय 60 वर्षांच्या वर होते. यात महत्त्वाची बाब म्हणजे एकूण मृत्यूंची संख्या आता नियंत्रणात आली आहे. (Mumbai Coronavirus Updates City records lowest COVID19 death count since last 2.5 months)

mumbai
मुंबई, उपनगरांमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाची हजेरी

कोरोना रुग्णवाढीचा सरासरी दर 0.12 टक्क्यांवर आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी 543 दिवसांवर गेला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 15,701 हजारांवर आला आहे.मुंबईत आज 751 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 6,80,009 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत आज 673 नवीन रुग्ण सापडले तर 751 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,13,002 इतकी झाली आहे. आतापर्यंत 64,80,491 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

mumbai
परदेशी जाणाऱ्यांच्या लसीकरणाबद्दल झाला मोठा निर्णय

मुंबईत 27 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 98 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 11,582 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 853 करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com