दिलासादायक! मुंबईतील रूग्णांचा आकडा हजाराच्या खाली

४४ जणांचा मृत्यू; रूग्ण दुपटीचा कालावधी २५५ दिवसांवर
corona vaccination
corona vaccinationcorona vaccination
Summary

४४ जणांचा मृत्यू; रूग्ण दुपटीचा कालावधी २५५ दिवसांवर

मुंबई: शहरात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचा (Coronavirus) प्रसार सुरू आहे. फेब्रुवारीपासून मुंबईत (Mumbai) कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मात्र ही लाट ओसरत असल्याचे रुग्णांच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. बुधवारी मुंबईमधील नव्या रुग्णांची (New Cases) संख्या बरेच दिवसांची एक हजारच्या खाली आली. दिवसभरात 953 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 लाख 90 हजार 889 वर पोहोचली. मात्र दु:खद बाब म्हणजे दिवसभरात 44 रुग्णांचा मृत्यू (Deaths) झाल्याने मृतांचा आकडा 14,352 वर पोहोचला. (Mumbai Coronavirus Updates New Cases comes down to triple digit 44 dead)

corona vaccination
मुंबई: तरूणाला विनामास्क पकडलं अन् पोलिसांना बसला धक्का

दरम्यान, दिवसभरात 2 हजार 258 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 6 लाख 41 हजार 598 रुग्णांनी कोरोनाला हरवले. त्यामुळे मुंबईत सध्या 32 हजार 925 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. 44 मृतांपैकी 28 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यात 26 रुग्ण पुरुष आणि 18 रुग्ण महिला होत्या. मुंबईचा रिकव्हरी रेट म्हणजेच रूग्ण बरे होण्याचा दर 93 टक्के आहे तर रूग्णवाढीचा दर 0.27 टक्के आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे आता मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 255 दिवसांवर गेला आहे.

गेल्या काही दिवसातील संख्या-

08 मे- 2678

09 मे- 2403

10 मे- 1794

11 मे- 1717

12 मे- 2116

13 मे- 1946

14 मे- 1657

15 मे- 1447

16 मे- 1544

17 मे- 1240

18 मे- 953

(संपादन- विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com