esakal | मुंबईत दिवसभरात 1,037  नवीन कोरोना रुग्णांची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Design

मुंबईत दिवसभरात 1,037  नवीन कोरोना रुग्णांची नोंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: शहरात आजही कोरोना रुग्णसंख्येत (Coronavirus) घट झाली असून दिवसभरात 1,037 नवीन कोरोना रुग्णांची (New Cases) नोंद झाली. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6 लाख 99 हजार 904 झाली. तर दिवसभरात 37 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा (Corona Deaths) आकडा 14 हजार 708 वर पोहोचला आहे. आज दिवसभरात 1 हजार 427 रुग्णांनी कोरोनावर मात (Corona Free) केल्याने आतापर्यंत 6 लाख 55 हजार 425 रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या 27 हजार 649 सक्रिय (Active Cases) रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. (Mumbai Coronavirus Updates new cases just over thousand Recovery rate around 94 percent)

हेही वाचा: विलेपार्ले: दिवंगत शिवसेना आमदाराच्या मालमत्तेवरुन वाद

मुंबईसाठी महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी म्हणजे शहराचा रिकव्हरी रेट. राज्याचा रिकव्हरी रेट म्हणजेच रूग्ण बरे होण्याचा दर हा 93 टक्के आहे. मुंबईत मात्र रूग्ण बरे होण्याचा दर हा आता 94 टक्क्यांवर पोहोचलाय. याशिवाय, कोविड रूग्णवाढीचा दर 0.19 टक्के इतका खाली आलाय. याचसोबत आणखी एक दिलासा देणारी गोष्ट म्हणजे रूग्ण दुपटीचा कालावधीही तब्बल 345 दिवसांवर पोहोचला आहे.