Mumbai : मेट्रो ६च्या १०८ डब्यांच्या खरेदीसाठी ९८९ कोटींचा खर्च; एमएमआरडीएने काढली निविदा

metro
metro

मुंबई : मुंबई मेट्रो ६ या 'स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी' या १२.३ किमीचा मेट्रो मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. ही मार्गिका पश्चिम उपनगरांना पूर्व उपनगरांशी जोडणारी उन्नत मार्गिका आहे. १५.८ किमी लांबीच्या या मार्गिकेवर एकूण १३ स्थानके आहेत. ६ हजार ६७२ कोटी रुपये इतका अंदाजे खर्च या मार्गिकेसाठी येणार आहे.

metro
Mumbai : नंदू जोशी प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी अधिवेशनात मुद्दा मांडणार; पटोलेंचा इशारा

या स्थानकांदरम्यान सहा डब्यांची मेट्रो धावणार आहे. या मेट्रोचे डबे पुरविण्यासह त्यांची चाचणी करणे व मेट्रो चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी एमएमआरडीएने निविदा काढली आहे.

या निविदेनुसार, एमएमआरडीए पहिल्या टप्प्यात १०८ डबे खरेदी करणार आहे. सहा डब्यांनुसार एकूण १८ गाड्या मागविल्या जात आहेत. त्यासाठी ९८९.८७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. संबंधित कंत्राटदाराला डबे यशस्वी चाचणीसह आणि चालकांच्या प्रशिक्षणासह १५९ आठवड्यांत पुरविण्यात येतील. ३१ जुलै २०२३ ही निविदा भरण्याची अंतिम तारीख आहे.

या मेट्रो गाडीच्या सहा डब्यांची एकूण प्रवासी हाताळणी क्षमता २,२८० असेल तर ३१६ प्रवासी बसू शकतील. ही गाडी कमाल ताशी १५० किमी, सरासरी ताशी ९० किमी व वळणदार रस्त्यावर सरासरी ताशी ३५ ते ५० किमी वेगाने धावू शकणारी असावी.

या मार्गिकेवरील फलाटांची लांबी १३८.२० मीटर व रुंदी ८ ते १२ मीटर असेल. तसेच रेल्वे रुळांपासून उंची १०७५ ते १०९५ मिलिमीटर इतकी आहे. हे सर्व ध्यानात घेत डब्यांची आखणी करावी, असे एमएमआरडीएने निविदेत म्हंटले आहे.

metro
'बायकोला खांद्यावर घेऊन नाचू शकतो, पण योगा नाही होणार', नरहरी झिरवळांबद्दल अजित पवार म्हणाले...

डबे येण्यापूर्वी डेपोचे काम पूर्ण करण्याचे आव्हान

‘मेट्रो ६’मधील कारशेड कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर क्षेत्रफळाच्या भूखंडावर उभारण्याचे प्रस्तावित आहे. ही मार्गिका २०२५ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर जागा एमएमआरडीएच्या ताब्यात दिली असून ‘मेट्रो ६’च्या कारशेडच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

आता लवकरच कारशेडच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. लवकरच या कामासाठी निविदा मागविण्यात येणार आहे. मात्र ही जागा कमी पडत असून आणखी ७ हेक्टर जागा मिळावी अशी मागणी एमएमआरडीएने राज्य सरकारकडे केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com