esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

COURT

मुंबई : पत्नीची हत्या केल्याच्या आरोपातील पतीची जन्मठेपेची सजा रद्द

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पत्नीची हत्या केल्याच्या आरोपात जन्मठेपेची सजा सुनावलेल्या पतीची सजा मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केली. पतीने रागाच्या भरात पत्नीच्या मारहाण केली पण तिची हत्या करण्याचा त्याचा उद्देश दिसून येत नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

न्या साधना जाधव आणि न्या सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे पतीने केलेल्या अपील याचिकेवर सुनावणी झाली. आरोपी अंकुश चव्हाण पत्नीला आणण्यासाठी तिच्या माहेरी गेला होता. मात्र तिने येण्यासाठी नकार दिला. त्यामुळे जे हाताला येईल ते त्याने रागाच्या भरात फेकून मारले. मात्र यामध्ये तिची हत्या करण्याचा त्याचा हेतू स्पष्ट होत नाही असे मत खंडपीठाने व्यक्त केले. तसेच पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला हा आरोप न्यायालयाने कायम ठेवला आणि त्याला आठ वर्ष कारावासाची सजा सुनावली. पती मागील पाच वर्षे कारागृहात आहे. इस्लामपूर न्यायालयाने त्याला जन्मठेपेची सजा सुनावली होती. ही शिक्षा उच्च न्यायालयाने रद्दबातल केली.

आरोपीच्या पत्नीने एप्रिल 2015 मध्ये सासरचे घर सोडून बहिणीकडे राहायला गेली होती. तिला घरी आणायला आरोपी गेला होता. पण तिने येण्यासाठी नकार दिला आणि त्यातून ही घटना घडली असे अभियोग पक्षाने म्हटले आहे.

loading image
go to top