दिलासादायक! मुंबईत 6 लाख 02 हजार,383 रुग्ण कोरोनामुक्त

मुंबईत आतापर्यंत 56 लाख 09 हजार,178 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
Corona Test
Corona TestSakal

मुंबई : मुंबईत (mumbai ) गुरुवार 3 हजार 838 रुग्णांनी कोरोनावर (covid) मात केली असून आतापर्यंत 6 लाख,02 हजार,383 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 50 हजार 606 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. (mumbai covid cases are decreasing )

मुंबईत आतापर्यंत 56 लाख 09 हजार,178 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्के आहे. कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर 0.51 टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 130 दिवसांवर आला आहे.

Corona Test
तुम्ही कोणता मास्क वापरता? निवड करतांना 'ही' काळजी घेताय ना?

गुरुवारी 3056 नवीन रुग्ण सापडले असून कोरोनाग्रस्तांचा एकूण संख्या 6, लाख 68 हजार,355 इतकी झाली आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 50,606 हजारांवर आला आहे. नव्या रुग्णांची संख्या स्थिरावल्याने रुग्णवाढीचा दर 0.51 पर्यंत खाली आला आहे. 

मुंबईत गुरुवारी दिवसभरात 69 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 13 हजार 616  वर पोहोचला आहे. मुंबईत 96 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 645 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 24,727 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये  अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 912 करण्यात आले.

धारावीतील 13 नवे रुग्ण

धारावीतील रुग्णसंख्या नियंत्रणात आली असून धारावीत 13 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 6574 वर पोहोचली आहे. दादरमध्ये आज 41 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 9074 झाली आहे. माहीम मध्ये 43 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 9211 इतके रुग्ण झाले आहेत.जी उत्तरमधील रुग्णसंख्या कमी झाली आहे. जी उत्तरमध्ये गुरुवारी 97 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 24,859 झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com