मुंबई: कोविडमुळे आतड्याजवळ होणाऱ्या गुठळ्यामधुन गँगरीनचा धोका

मुंबईत असे रुग्ण आढळून आलेत
मुंबई: कोविडमुळे आतड्याजवळ होणाऱ्या गुठळ्यामधुन गँगरीनचा धोका
File photo

मुंबई: आतापर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांचे हात-पाय, ह्दय आणि मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे प्रकार आढळून आले आहेत. आता आतड्याकडच्या भागामध्येही गुठळ्या (Covid induced clots) आणि गँगरीन होत असल्याचं समोर आलं आहे. शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये असे बारापेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. डॉक्टर्स आणि सर्जन्सकडून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोटदुखीच्या तक्रारी (stomach pain) वाढल्या असतील, तर संपूर्ण निदान आवश्यक असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. (Mumbai Covid induced clots now causing near fatal gangrene in intestine)

अलीकडेच अंधेरीतील एका रुग्णालयात एका रुग्णाच्या शरीरात कोविडमुळे आतड्यांजवळ गुठळ्या निर्माण झाल्याचे आढळून आले. या ५८ वर्षीय रुग्णाने दुपारचे जेवण घेतल्यानंतर अचानक पोटदुखीचा त्रास सुरु झाला. पोटदुखीचा त्रास थांबतच नव्हता. या रुग्णाने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले होते. औषधांनी जेव्हा रुग्णाच्या पोटातील दु:खण थांबत नव्हतं, तेव्हा डॉक्टरांनी सीटी स्कॅन करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आतड्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये गुठळ्या झाल्याचे आढळून आले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

मुंबई: कोविडमुळे आतड्याजवळ होणाऱ्या गुठळ्यामधुन गँगरीनचा धोका
लोकलमध्ये मोबाइल चोराला पकडण्याच्या झटापटीत तिचं आयुष्य संपलं

सीटी स्कॅनमध्ये गुठळ्या दिसल्यानंतर डॉक्टरांकडे फार वेळ नव्हता. कारण गुठळ्यांमुळे गँगरीन झालं असतं. वेळीच उपचार केले नाहीत, तर ते रुग्णासाठी धोकादायक ठरलं असतं. अखेर डॉक्टरांनी योग्य उपचारांनी त्या गुठळ्या काढल्या. "मागच्या आठ-नऊ महिन्यातील ही अशी दहावी केस आहे. जिथे कोविड आणि आतड्यांजवळ गुठळ्या आढळून आल्या" असे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com