Mumbai : क्रिकेटपटू पृथ्वी शॉ हल्ला प्रकरण- चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पृथ्वी शॉ

Mumbai : क्रिकेटपट्टू पृथ्वी शॉ हल्ला प्रकरण- चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी

मुंबई - क्रिकेटपट्टू पृथ्वी शॉ हल्ला प्रकरणात चारही आरोपींना सोमवारी मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ओशिवरा पोलिसांनी सपना गिलसह चार आरोपींना आज न्यायालयात हजर केले.

पोलिसांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती मात्र न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावत न्यायालयीन कोठडी दिली सपना गिलने लवकरच जामिनासाठी न्यायालयात अर्ज करणार आल्याची माहिती सपना गिल यांच्या वकील काशिफ खान यांनी दिली आहे.

क्रिकेटपट्टू पृथ्वी शॉ हल्ला प्रकरणात युट्यूबर सपना गिल सह चार आरोपींना ओशिवरा पोलिसांनी अटक केली होती.

घटनेची पार्श्भूमी

15 फेब्रुवारी बुधवारी पृथ्वी शॉ आपल्या मित्रासोबत मुंबईतल्या सहारा स्टार हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले होते. यादरम्यान क्रिकेटरचा एक चाहता आणि एक महिला चाहती त्याच्या टेबलाजवळ आला.

महिला चाहत्याने क्रिकेटरसोबत सेल्फी काढण्यास सुरुवात केली. काही फोटो आणि व्हिडीओ काढूनही तो हे थांबला नाही, तेव्हा क्रिकेटपट्टूने रेस्टॉरंटच्या मालकाला फोन करून चाहत्यांना हटवण्यास सांगितले. रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाने चाहत्यांना तेथून हटवले.

सेल्फिमुळे गाडीवर हल्ला

मात्र यामुळे संतापलेले दोन्ही चाहते रेस्टॉरंटबाहेर क्रिकेटरची वाट पाहत राहिले. त्यांना पृथ्वीबरोबर सेल्फी घ्यायचा होता. पण पृथ्वी शॉने त्यांना नकार दिला आणि त्याची कार पुढे निघून गेली. सेल्फीला नकार दिल्याने त्यांनी रागातून त्याच्या कारवर हल्ला केला.

सुदैवाने या हल्ल्यात पृथ्वीला कोणताही दुखापत झाली नाही. त्यानंतर आरोपींनी पृथ्वी शॉच्या व्यावसायिक मित्राकडे प्रकरण मिटवण्यासाठी 50 हजाराची मागणी केली. पैसे न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी व्यावसायिकाला दिली.

हल्ला झाल्यानंतर पृथ्वी शॉचा मित्र कार घेऊन ओशिवरा पोलीस स्टेशनला दाखल झाला. त्याने याप्रकरणी तक्रार दाखल केली