Mumbai Crime News : दोन महिन्यात 8 घरफोड्या... मानपाडा पोलिसांनी चोराच्या आवळल्या मुसक्या

लॉकडाऊन नंतर कल्याण डोंबिवलीकडे मोर्चा
Mumbai Crime 8 house burglaries in two months Manpada police caught thief
Mumbai Crime 8 house burglaries in two months Manpada police caught thief sakal

डोंबिवली - कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या काही महिन्यांपासून घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या घरफोड्या रोखण्यासाठी विशेष पथक स्थापन करत अट्टल चोरांचा शोध सुरु केला असून मानपाडा पोलिसांनी शंकर सूर्यवंशी उर्फ धोत्रे उर्फ चेनाळे (वय 26) या सराईत चोरास अटक केली आहे.

शंकरने लॉकडाऊन नंतर कल्याण डोंंबिवलीत दोन महिन्यात तब्बल 8 घरफोड्या केल्याची बाब उघड झाली आहे. शंकरने केलेल्या 10 गुन्ह्यांची उकल करत पोलिसांनी त्याच्याकडून 200 ग्रॅम वजनाचे सोन्या चांदिचे दागिने व 12 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.

रात्रीच्या वेळेस बंद घरांना चोरटे लक्ष करतात परंतू आजकाल दिवसा ढवळ्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. लॉकडाऊन काळात अनेक चाकरमानी हे घरातून काम करत असल्याने व जनजीवन ठप्प असल्याने या दिवसांत घरफोड्यांचे प्रमाण कमी होते.

परंतू लॉकडाऊन उघडताच चाकरमानी पुन्हा ऑफिसवर रुजू होऊ लागले तसे दिवसा ढवळ्या घरफोड्यांच्या सत्रात वाढ झाली आहे. वाढते घरफोड्यांचे प्रमाण वाढता घरफोडीतील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने दोन महिन्यात तब्बल 8 घरफोड्या करणाऱ्या शंकर याला द्वारली गावातून अटक केली आहे.

चौकशीत त्याने मानपाडा, डोंबिवली व विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 10 घरफोड्या केल्याची बाब उघड झाली आहे. 2021 व 2022 मध्ये दोन घरफोड्या त्याने केल्या असून त्यानंतर 2023 मध्ये तब्बल 8 घरफोड्या केल्या आहेत.

शंकर हा अट्टल गुन्हेगार असून यापूर्वी तो मुंबई परिसरात चोरी करत होता. लॉकडाऊन नंतर त्याने कल्याण डोंबिवली परिसरात चोरीचा सपाटा सुरु केला होता. शंकर हा चोरी करण्याच्या परिसरात रेकी करायचा, बंद घरे आणि सुरक्षा रक्षक नसलेली सोसायटी तो हेरायचा. त्यानंतर कटावणी, स्क्रू ड्रायव्हर यांच्या मदतीने कडी कोयंडा सैल करुन घरात प्रवेश करुन तो चोरी करायचा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com